नागलकर हॉस्पिटलमध्ये रक्तदात्यांनी जपलं ‘रक्ताचं नातं’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:10 IST2021-07-16T04:10:35+5:302021-07-16T04:10:35+5:30
अमरावती : शहरातील नागलकर हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीप्रीत्यर्थ ...

नागलकर हॉस्पिटलमध्ये रक्तदात्यांनी जपलं ‘रक्ताचं नातं’
अमरावती : शहरातील नागलकर हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीप्रीत्यर्थ लोकमत वृत्तपत्र समूह व जेसीआय अमरावती गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ जुलै रोजी रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी २४ जणांनी रक्तदान केले.
जेसीआयचे माजी अध्यक्ष डॉ. हृषीकेश नागलकर, डॉ. रश्मी नागलकर, अध्यक्ष डॉ. सचिन अग्रवाल, सचिव सचिन अवघड, डॉ. मधुरा सज्जनकर, जेसीरेट विंग सचिव दीपाली बाभूळकर, जेसीरेट सचिव डॉ. स्वाती टोंगळे, प्रकल्प संचालक देवेंद्र नानोटकर, डॉ. शिल्पा ढवळे, अभिजित काळबांडे, जेसी सारंग राऊत, ज्ञानेश्वर टाले, अपर्णा ठाकरे, कौसर अली, शशिकांत डांगे, राजू डांगे, मेघाबोबडे, कुशल झंवर, हेमंत निमजे, सुनील जयस्वाल, रूपेश टाले, चेअरमन सौरभ ढोले, किरण पांडे, स्मिता पोकळे आदींनी रक्तदान शिबिराकरिता परिश्रम घेतले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमूने रक्तसंकलन केले.