पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST2021-06-01T04:10:21+5:302021-06-01T04:10:21+5:30

अमरावती : धनगर समाज महासंघप्रणीत मल्हार सेने, अहिल्यादेवी महिला संघ, कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यामाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ...

Blood donation on the occasion of Punyashlok Ahilya Devi Holkar's birthday | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान

अमरावती : धनगर समाज महासंघप्रणीत मल्हार सेने, अहिल्यादेवी महिला संघ, कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यामाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९३ वी जयंती किशोरनगर येथे कोरोना नियमावली पाळून साजरी करण्यात आली.

जयंतीनिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाच्या काळात रक्ताची कमतरता लक्षात घेता युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाज महासंघप्रणीत मल्हार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश घुरडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नाना नागमोते, मनोहर बुध, संजय शेंडे, अमर घटारे, डॉ. वैभव ढवळे हे होते. अहिल्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीना घुरडे, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण उघडे, सचिन कोल्हे, कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष राजू आगरकर, अवकाश बोरसे, गौरी घुरडे, सृष्टी घुरडे आदींची उपस्थिती होती.

-----------------------

Web Title: Blood donation on the occasion of Punyashlok Ahilya Devi Holkar's birthday