शेंदूरजना बाजार येथे गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:11 IST2021-07-25T04:11:40+5:302021-07-25T04:11:40+5:30

तिवसा : श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार येथे ३० भाविकांनी गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने रक्तदान केले. श्रीसंत अच्युत महाराज संस्थान, जय बजरंग स्पोर्टिंग ...

Blood donation on the occasion of Gurupournima at Shendoorjana Bazaar | शेंदूरजना बाजार येथे गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान

शेंदूरजना बाजार येथे गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान

तिवसा : श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार येथे ३० भाविकांनी गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने रक्तदान केले. श्रीसंत अच्युत महाराज संस्थान, जय बजरंग स्पोर्टिंग क्लब व क्रीडा मंडळ, सावित्रीबाई वाचनालय, श्रीसंत अच्युत महाराज बहुउद्देशीय संस्था यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्यापूर्वी श्रीसंत अच्युत महाराज यांच्या महासमाधीचे पूजन व अभिषेक डॉ. अनिल सावरकर, डॉ. अनिल कविमंडन, प्रमोद निमकर, मनोहर निमकर, जगदीश काळे, राजेंद्र देवळे, वामनराव भोजने व भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आला. क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते किरण वैद्य, हृषीकेश सावरकर, अतुल येणोरकर, सागर देवळे, श्रीकांत ढवळे, राहुल वैद्य, प्रवीण कुंबळे, दिनेश सावरकर, अमोल वैद्य, विशाल येणोरकर, राहुल गवळी, आशिष कुबडे, प्रमोद कोकाटे, उमकांत सावरकर, मंगेश पडघान, अक्षय भेलकर, हर्षल निमकर, मनोज पडघान, सर्वेश सावरकर, विलास गवळी, सूरज निमकर, सागर देवळे, जयंत सावरकर, अक्षय सावरकर, राम सोनटक्के, शुभम देवळे, वेदांत वैद्य, अवधूत वैद्य, प्रतीक कोकाटे, शुभम भोजने, प्रणव शेळके, राहुल गवळी, प्रशांत गवळी, रवि बोडखे, सागर भुसारी आदींनी रक्तदान केले.

Web Title: Blood donation on the occasion of Gurupournima at Shendoorjana Bazaar