युवादिनी क्रीडा संकूलात रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:11 IST2021-01-15T04:11:47+5:302021-01-15T04:11:47+5:30
अमरावती : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवादिनी तसेच राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ...

युवादिनी क्रीडा संकूलात रक्तदान शिबिर
अमरावती : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवादिनी तसेच राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रमाता जिजाऊ शिक्षण व सामाजिक बहुउद्देशीय संस्था (शिवछत्रपती क्रीडा मंडळ शिवनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे मंगळवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ३१ दात्यांनी रक्तदान केले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी संदीप इंगोले यांनी उपस्थित युवकांना, रक्तदात्यांना मार्गदर्शन करून युवकांचा उत्साह वाढविला. संचालन क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांनी केले. क्रीडा अधिकारी दीपक समदुरे, संतोष विघ्ने, भाष्कर घटाळे, वैशाली घोम, जिल्हा संघटक उमेश बडवे उपस्थित होते. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रक्तपेढीचे डॉ.सचिन काकडे, निकिता ढगे, परशुराम पवार, साहेबराव अलमाबादे यांनी रक्त संकलन केले.