मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:14 IST2021-09-23T04:14:31+5:302021-09-23T04:14:31+5:30

आवश्यक पान ३ वर अमरावती : अभियंत्यांचे श्रध्दास्थान मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्म दिवस देशभरात अभियंता दिन म्हणून साजरा ...

Blood donation camp on the occasion of Mokshagundam Visvesvaraya's birthday | मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

आवश्यक पान ३ वर

अमरावती : अभियंत्यांचे श्रध्दास्थान मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्म दिवस देशभरात अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने कनिष्ठ अभियंता संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. दक्षता व गुणनियंत्रणाचे अधीक्षक अभियंता विशाल जवंजाळ यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी सुनील थोटांगे, अभियंता घनश्याम पवार, कमल मालवीय तथा विदर्भ कंत्राटदार संघटनेचे नितीन डहाके उपस्थित होते. युवा अभियंता प्रतीक घनश्याम पवार व चक्षिका घनश्याम पवार यांचे रक्तदानाने झाली. रक्तदान शिबिरासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रामुख्याने महिला अभियंत्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. पाटबंधारे विभाग अमरावतीचे कार्यकारी अभियंता एम.एम. रासनकर यांनीदेखील रक्तदान केले.

Web Title: Blood donation camp on the occasion of Mokshagundam Visvesvaraya's birthday