नेरपिंगळाई येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:16 IST2021-09-17T04:16:59+5:302021-09-17T04:16:59+5:30

नेरपिंगळाई : ‘गणेशाच्या चरणी रक्ताचे दान’ ही सामाजिक संकल्पना घेऊन गुरू गंगाधर स्वामी मठ संस्थान, शिरखेड पोलीस ठाणे व ...

Blood donation camp at Nerpingalai | नेरपिंगळाई येथे रक्तदान शिबिर

नेरपिंगळाई येथे रक्तदान शिबिर

नेरपिंगळाई : ‘गणेशाच्या चरणी रक्ताचे दान’ ही सामाजिक संकल्पना घेऊन गुरू गंगाधर स्वामी मठ संस्थान, शिरखेड पोलीस ठाणे व सप्तशृंगी गणेश मंडळाच्यावतीने गुरू गंगाधर स्वामी मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मठाधिपती शिवशंकर स्वामी होते. उद्घाटन ग्रामविकास अधिकारी विनोद मनवर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील राजेश राऊत, बीट अंमलदार श्याम चुंगडा, किरण लाकडे, नीलेश देशमुख यांची उपस्थिती होती. एकूण २१ रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केले. शिबिराकरिता निखील वासनकर, मनोज कोकाटे, अंकुश बेहरे, राहुल पाचघरे, मिलिंद कोकाटे, दिनेश बेहरे, मंगेश बेहरे, विशाल बेहरे, हर्षल गाढवे, विजय मोर्चापुरे यांनी परिश्रम घेतले. संचालन सिद्धार्थ दाभेकर, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राहुल मंगळे यांनी केले.

Web Title: Blood donation camp at Nerpingalai