शहर जिल्हा काँग्रेसतर्फे कोविड रुग्णांकरिता रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST2021-04-11T04:12:47+5:302021-04-11T04:12:47+5:30
अमरावती : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार कोविड रुग्णांच्या मदतीसाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले ...

शहर जिल्हा काँग्रेसतर्फे कोविड रुग्णांकरिता रक्तदान शिबिर
अमरावती : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार कोविड रुग्णांच्या मदतीसाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ दरम्यान शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय राजकमल चौक येथे हे शिबिर होईल.
कोविड रुग्णांची होणारी हेळसांड व गैरसोय पाहता या रुग्णांना मार्गदर्शन व उपचाराची माहिती देणे, प्लाझ्मा उपलब्ध करून देणे, दवाखान्यात बेड उपलब्ध करून देणे, योग्य उपचार वेळेत मिळण्यासाठी एक हेल्पलाईन तयार करण्याबाबत आयोजित बैठकीत ठरविण्यात आले. अमरावती शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित सभेत शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, उपाध्यक्ष संजय वाघ, सरचिटणीस मनोज भेले, उपाध्यक्ष राजा बांगडे, युवक काँग्रेस अध्यक्ष नीलेश गुहे, महासचिव सागर देशमुख, समीर जवंजाळ, महिला काँग्रेस अध्यक्ष देवयानी कुर्वे, नगरसेवक शोभा शिंदे, शहराध्यक्ष ऋग्वेद सरोदे, अल्पसंख्याक अध्यक्ष अब्दुल रफीक, जियाखान, सुरेश रतावा, आकाश तायडे, रफीक, शम्स परवेज, मनीष पावडे आदी उपस्थित होते.
सर्व कार्यकर्त्यांना व रक्तदात्यांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन बबलू शेखावत यांनी केले आहे.