कावली येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:13 IST2021-01-20T04:13:55+5:302021-01-20T04:13:55+5:30

कावली वसाड : स्थानिक ॲलोपॅथिक दवाखान्यात तेजस धुर्वे मित्रपरिवारच्यावतीने १७ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिरात ...

Blood donation camp at Kavali | कावली येथे रक्तदान शिबिर

कावली येथे रक्तदान शिबिर

कावली वसाड : स्थानिक ॲलोपॅथिक दवाखान्यात तेजस धुर्वे मित्रपरिवारच्यावतीने १७ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिरात ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रहारचे उपजिल्हाध्यक्ष दिवंगत तेजस धुर्वे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हे आयोजन पार पडले. जिल्हाध्यक्ष प्रवीण हेंडवे, गजेंद्र रोडे, संजय इंगळे, विजय माकोडे, पोलीस पाटील अतुल परतेकी, ॲलोपॅथिक दवाखान्याचे कर्मचारी व मित्र परिवार याप्रसंगी उपस्थित होता. अमरावती येथील रक्तपेढीने रक्तसंकलन केले. संचालन नीलेश मोहकार व आभार प्रदर्शन अमर ठाकरे यांनी केले.

कार्यक्रमासाठी अतुल टाले, अमर ठाकरे, शैलेश टाले, नीलेश मोहकार, प्रवीण धुर्वे, अभिजित ठाकरे, उमेश हिवसे, नरेंद्र कुटे, गौरव हिवसे, शुभम ठाकरे, विकी ढोले, सूरज भोंगाडे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation camp at Kavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.