गुरुकुंज मोझरीत रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST2021-07-18T04:10:35+5:302021-07-18T04:10:35+5:30
महायज्ञाची सांगता, रुग्णालयाच्या स्मृती भवनाचे बाबूजींनी केले होते उदघाटन अमित कांडलकर - गुरुकुंज (मोझरी) : ज्यांनी या रुग्णालयाच्या स्मृती ...

गुरुकुंज मोझरीत रक्तदान शिबिर
महायज्ञाची सांगता, रुग्णालयाच्या स्मृती भवनाचे बाबूजींनी केले होते उदघाटन
अमित कांडलकर - गुरुकुंज (मोझरी) : ज्यांनी या रुग्णालयाच्या स्मृती भवनाचे आरोग्यमंत्री असताना उद्घाटन केले, ते ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून राज्यभर उभारण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञाची गुरुकुंजात शनिवारी सांगता झाली.
शिबिरात तरुण युवकांनी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी घेऊन रक्तदान केले. मानवता फाऊंडेशन, युवा संघर्ष संघटना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचासह विविध संघटनानी शिबिराला अमूल्य सहकार्य केले. यावेळी आकाश डेहनकर, अमर वानखडे, जसबीर ठाकूर आदी संघटनाप्रमुखांनी आवर्जून उपस्थिती नोंदविली. लोकमतचे विभागीय वितरण व्यवस्थापक रवींद्र खांडे, अमोल कडुकार, अमित कांडलकर, सूरज दाहाट, अतुल खुळे उपस्थित होते.
तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील श्रीगुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालय व अनुसंधान केंद्र येथे शनिवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. २८ ऑक्टोबर १९८८ रोजी याच रुग्णालयामधील डॉ. के.जी. जयस्वाल स्मृती भवनाचे उद्घाटन आरोग्यमंत्री असताना जवाहरलालजी दर्डा यांनीच केले होते. यावेळी त्यांच्यासोबत तत्कालीन समाजकल्याण मंत्री सुधाकरराव नाईक उपस्थित होते, हे विशेष
-------------------------------------------------------
ही ठरली वैशिष्ट्ये
नव्याने सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागातून अनेक लोकप्रश्न शासनदरबारी रेटून धरणारे युवा संघर्ष संघटनेचे जसबीर ठाकूर यांनी परिसरातील होतकरू तरुणांना आवर्जून या शिबिरात सहभाग नोंदविला. यामध्ये तिन्ही ऋतूंमध्ये दिवस-रात्र चहा कँटीन चालवून कुटुंबाचा गाडा हाकण्यास मदत करणाऱ्या ऋत्विक राऊत या युवकाचे रक्तदान प्रकर्षाने लक्षवेधी ठरले.