चांदूर रेल्वेत काँग्रेस कमिटीतर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST2021-04-18T04:12:08+5:302021-04-18T04:12:08+5:30

चांदूर रेल्वे : शहरातील आनंदराव सभागृहात येथे चांदूर रेल्वे शहर व तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस ...

Blood donation camp by Congress Committee at Chandur Railway | चांदूर रेल्वेत काँग्रेस कमिटीतर्फे रक्तदान शिबिर

चांदूर रेल्वेत काँग्रेस कमिटीतर्फे रक्तदान शिबिर

चांदूर रेल्वे : शहरातील आनंदराव सभागृहात येथे चांदूर रेल्वे शहर व तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस कमिटी व विद्यार्थी काँग्रेस कमिटी यांच्यावतीने १६ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात ३८ जणांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते पार पडले. शिबिरात रक्तसंकलन अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयाच्या डॉ. निकिता ठाकूर, प्राजक्ता गुल्हाणे, अमोल कुचे, संजय दहीकर व हरीस खान यांच्या चमूने केले. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप वाघ,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नितीन गोंडाणे, परिक्षीत जगताप, जगदीश आरेकर, नगराध्यक्ष नीलेश सूर्यवंशी, गोविंदराव देशमुख, हरिभाऊ गवई, भानुदास गावंडे, प्रफुल कोकाटे, सतपाल वरठे, अतुल चांडक, अमोल होले, प्रशांत भेंडे, अनंत पोलाड, पंकज मेश्राम. देवानंद खुने, अरविंद गुडदे. तेजस भेंडे आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp by Congress Committee at Chandur Railway