राधाकृष्ण गणेश मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST2021-09-22T04:14:14+5:302021-09-22T04:14:14+5:30
सर्वप्रथम सुनीता घोरमाडे व नगराध्यक्ष मेघना मोहन मडघे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. राधाकृष्ण गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निखिल ओझा ...

राधाकृष्ण गणेश मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर
सर्वप्रथम सुनीता घोरमाडे व नगराध्यक्ष मेघना मोहन मडघे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. राधाकृष्ण गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निखिल ओझा यांच्या संकल्पनेतून गेल्या पाच वर्षांपासून मोर्शीचा राजाची स्थापना करण्यात आली. मंडळाचे कार्यकर्ते सुनील घोरमाडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रक्तदान कार्यकर्त्यांनी घडवून आणले. रक्तसंकलनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. स्नेहा पावडे, डॉ. सुप्रिया पाटील, राहुल गवई, संजय दहीकर, वैभव नासरे, सूरज नागपुरे, अमोल तेटू उपस्थित होते. कार्यक्रमाला राधाकृष्ण गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निखिल ओझा, मंडळाचे अध्यक्ष नितीन काकपुरे, उपाध्यक्ष मोहन मडघे, सचिव दिलीप अग्रवाल, डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, अविनाश अग्रवाल, गिरीधर मंत्री, ज्योतिप्रसाद मालवीय, युवा उद्योजक जगदीश जयस्वाल, संजय राऊत, डॉ. विश्वास, नंदू मंत्री, दुर्गेश मंत्री, सुनील कोहळे, नीलेश महल्ले उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पवन शर्मा, पंकज शर्मा, लकी अंगगानी, रावसाहेब भाऊ, राजेश पाटील, रमेश आप्पा वाले, दिनेश काकपुरे, डॉ. नामदेव रडके, विजय गावंडे आदींनी परिश्रम घेतले.