चांदूर बाजार येथे रक्तदान शिबिरात ६० जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:12 IST2021-04-22T04:12:39+5:302021-04-22T04:12:39+5:30
चांदूर बाजार : कोरोनाच्या संकटाने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशातच राज्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या आढळून येत आहे. ...

चांदूर बाजार येथे रक्तदान शिबिरात ६० जणांचे रक्तदान
चांदूर बाजार : कोरोनाच्या संकटाने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशातच राज्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या आढळून येत आहे. रक्ताचा साठा कमी पडत असल्याने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या पुढाकाराने १४ तालुक्यात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिरे घेतली जात आहेत. चांदूर बाजार येथे सोमवारी पाड पडलेल्या रक्तदान शिबिरात ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्षांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. रक्तदान शिबिरात गोकुल कोल्हे, आशिष चौधरी, पंकज वानखडे, शुभम बारबुध्दे, सचिन बंड, चेतन बारबुध्दे, विकास सोनार, अनिकेत जवंजाळ, नीलेश डांगे, शैलेश टेकाडे, प्रदीप गायकवाड, नंदकिशोर पुंडकर, संदीप पांडे, भूषण देशमुख, मधुसुदन राऊत, अनिल वानखडे, मयुर चुनडे, जयेश वानखडे, सुदेश मोहोड, उपेंद्र मोहोड, संजय गावंडे आदींसह अन्य जणांनी रक्तदान केले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर देशमुख, शहराध्यक्ष हसनखा पठाण, सभापती सतीश धांडे, अरविंद लंगोटे, बाळासाहेब अलोणे, शिवाजी बंड, भाई देशमुख, किशोर किटुकले, सुधीर वाटाणे, आर. के. घुलक्षे, प्रताप किटुकले, विलास शेकार आदी पदाधिकारी उपस्थित होते.