नववर्षाच्या प्रारंभी ११८ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:11 IST2021-01-04T04:11:23+5:302021-01-04T04:11:23+5:30
वरूड : स्थानिक दि ग्रेट मराठा फाउंडेशन आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाच्या प्रारंभी झालेल्या ...

नववर्षाच्या प्रारंभी ११८ जणांचे रक्तदान
वरूड : स्थानिक दि ग्रेट मराठा फाउंडेशन आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाच्या प्रारंभी झालेल्या शिबिरात ११८ जणांनी रक्तदान केले. माजी मंत्री अनिल बोंडे यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
ठाणेदार श्रेणिक लोढा, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मालपे, सोपान कन्हेरकर, डॉ. मनोहर आंडे, नितीन खेरडे, राजकुमार राऊत, डॉ. सागर पावडे , विजय श्रीराव, नीलेश फुटाणे, संदीप तरार, लोकेश अग्रवाल, डॉ. प्रवीण ठाकरे, डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. महेंद्र राऊत, शैलेश देशमुख, मुरलीधर पवार, यशपाल जैन, नंदकिशोर आजनकर, चंदू कडू, राजू सुपले आदी उपस्थित होते. नागपूरच्या हेडगेवार रक्तपेढीने रक्तसंकलन केले. रक्तदान शिबिराकरिता दि ग्रेट मराठा फाउंडेशनचे नितीन गुर्जर, दीपक कोचर, यशपाल राऊत, नितीन देवघरे, विशाल आजनकर, बबलू भोरवंशी, रोशन पांडे, उमेश नागले, भाजप युवा मोर्चा, क्रांती युवा ग्रुप, उंच भरारी, जायंट्स ग्रुप, समाजप्रबोधन मंच, मातोश्री हॉस्पिटल, पावडे हॉस्पिटल, संकल्प युवा ग्रुप, सहजीवन सोशल क्लब, हेल्प फाउंडेशन आदी सेवाभावी संस्थांनी सहकार्य केले.
--------