अचलपुरात १०२ रक्तदात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:12 IST2021-04-22T04:12:41+5:302021-04-22T04:12:41+5:30
अचलपूर : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ...

अचलपुरात १०२ रक्तदात्यांचे रक्तदान
अचलपूर : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख ब्लड बँकेच्या चमूने रक्तदान शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले.
शिबिराचा प्रारंभ बबलू देशमुख यांचे हस्ते व आमदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत समर्थनगर येथील सुलतानपुरा येथे करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष श्रीधर काळे, शहराध्यक्ष श्रीकांत झोडपे, राजेंद्र गोरले, अमोल बोरेकर, विजय मडघे, सुनील तायडे, नामदेव तनपुरे, राजेश काळे, राहुल गाठे, प्रशांत गोरले, दिनेश वानखडे, अजिज खान, इकबाल पटेल, निकेश दाभाडे, अमोल ठाकरे, ओम घोरे, सागर व्यास, आबा पाटील, अनिस खान, मतीन खान, प्रवीण हिरूळकर, अनूप हिरूळकर, नरेंद्र येऊतकर, देवेंद्र ठाकरे, सतीश भोरे, मयुर तिखिले, शुभम गायकवाड, मनोज काळे, बबनराव काटोलकर, अविनाश कडू आदींंनी सहभाग घेतला होता.