नवदांपत्याची आशीर्वाद रक्कम ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला
By Admin | Updated: December 10, 2015 00:19 IST2015-12-10T00:19:13+5:302015-12-10T00:19:13+5:30
समाजात वावरत असताना समाजऋणाची भरपाई करण्याचा प्रयत्न शहरातील बुधवारा भागात राहणाऱ्या डहाळे कुटुंबाने करून आदर्श स्थापित केला आहे.

नवदांपत्याची आशीर्वाद रक्कम ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत : डहाळे कुटुंबाने ठेवला आदर्श
अमरावती : समाजात वावरत असताना समाजऋणाची भरपाई करण्याचा प्रयत्न शहरातील बुधवारा भागात राहणाऱ्या डहाळे कुटुंबाने करून आदर्श स्थापित केला आहे. डहाळे कुटुंबात मागील आठवड्यात झालेल्या विवाह समारंभात नवदांपत्याला आशीर्वादस्वरूप मिळालेली मिळालेली १० हजारांची रक्कम त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाला मिळावी, या हेतूने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी किरण गूत्ते यांच्या सुपूर्द केली. डहाळे कुटुंबाच्या या कृतीचे परिसरात कौतुक होत आहे.
बुधवाऱ्यातील अलका व नंदकिशोर डाहाळे यांचे सुपुत्र हृषीकेश याचा विवाह सोहळा बीड येथे २४ नोव्हेंबर रोजी पार पडला. स्वागत सोहळ्यात उपस्थितांनी नवदांपत्याला रोख रक्कम व पाकिटे दिली. ही १० हजारांची रक्कम या कुटुंबाने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत म्हणून देण्याची इच्छा दर्शविली. त्यानुषंगाने ही रक्कम त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली. एकीकडे लग्न सोहळ्यात लाखोंचा विनाकारण खर्च केला जातो. यावेळी सामाजिक बांधिलकी जपण्याचे भान अपवादानेच आढळते. मात्र, विपरित स्थितीत संघर्ष करून पुढे गेलेल्या डहाळे कुटुंबाने हे भान जपले आणि कृतीतूनही सिध्द केले. (प्रतिनिधी)