काळी-पिवळी वाहनाची दुचाकीला धडक, युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST2021-04-11T04:12:56+5:302021-04-11T04:12:56+5:30
अमरावती : काळी-पिवळी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार झाल्याची घटना वलगाव मार्गावरील नवसारीनजीक अमन ...

काळी-पिवळी वाहनाची दुचाकीला धडक, युवक ठार
अमरावती : काळी-पिवळी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार झाल्याची घटना वलगाव मार्गावरील नवसारीनजीक अमन पॅलेससमोर शुक्रवारी रात्री ९.४५ च्या सुमारास घडली.
अक्षय सुभाष उमाळे (२७, रा. डोंगरगाव, ता. दर्यापूर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी काळी-पिवळी (एमएच २९-३९२७) चा चालक परवेज खान फिरोज खान ( रा. खोलापूर) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०४ (अ), २७९ अन्वये गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. सदर युवक अमरावतीहून वलगाव मार्गे दर्यापूरला जात होता. विरुद्ध दिशेने आलेल्या काळी-पिवळीने जोरदार धडक दिल्याने युवकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तो घटनास्थळीच ठार झाला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकर करीत आहेत.