‘चक्काजाम’साठी भाजपची तयारी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:10 IST2021-06-26T04:10:11+5:302021-06-26T04:10:11+5:30

अमरावती : ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्याच्या मागणीसाठी भाजपने २६ जून रोजी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे. हे आंदोलन ...

BJP's preparations for 'Chakkajam' are in full swing | ‘चक्काजाम’साठी भाजपची तयारी जोरात

‘चक्काजाम’साठी भाजपची तयारी जोरात

अमरावती : ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्याच्या मागणीसाठी भाजपने २६ जून रोजी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पक्षातील ओबीसी कार्यकर्त्यांना बळ देऊन मोट बांधणे सुरु आहे. पक्षाच्या सर्व आघाड्यांना पूर्ण क्षमतेने आंदोलनात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अमरावती येथील वेलकम पॉईंटवर सकाळी ११ वाजता रास्ता रोको केला जाणार आहे. माजी राज्यमंत्री तथा अमदार पालकमंत्री प्रवीण पोटे हे या आंदोलनाचे नेतृत्व करतील. तर अमरावती ग्रामीणमध्ये सहा विधानसभा स्तरावर स्वतंत्रपणे आंदोलने होतील. माजी राज्यमंत्री आ. संतोष कुटे हे नेतृत्व करतील. यामध्ये भाजपचे विविध कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होतील. या आंदोलनासाठी पक्षातील ओबीसी नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ओबीसी आघाडीच्या बैठकी सुरू आहेत. कोरोनाचे नियम पाळून आंदोलन केले जाईल, असे भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: BJP's preparations for 'Chakkajam' are in full swing