भाजपजनांचे परिश्रम फळले

By Admin | Updated: May 17, 2014 23:08 IST2014-05-17T23:08:34+5:302014-05-17T23:08:34+5:30

अमरावती लोकसभा क्षेत्रातून शिवसेना-भाजप महायुतीची जागा निवडून यायलाच हवी यासाठी भाजपजनांनी केलेले कठोर परिश्रम आणि पक्षात दुफळी असतानाही ध्येयप्राप्तीसाठी एकदिलाने

The BJP's hard work was successful | भाजपजनांचे परिश्रम फळले

भाजपजनांचे परिश्रम फळले

>अमरावती लोकसभा क्षेत्रातून शिवसेना-भाजप महायुतीची जागा निवडून यायलाच हवी यासाठी भाजपजनांनी केलेले  कठोर परिश्रम आणि पक्षात दुफळी असतानाही ध्येयप्राप्तीसाठी एकदिलाने काम करणार्‍या शिवसेनेत जागलेल्या  स्पिरिटचे अखेर चीज झाले. 
अमरावती लोकसभेतून दुसर्‍यांदा प्रतिनिधित्त्व करणारे आनंदराव अडसूळ हे तसे पाचव्यांचदा खासदार झालेत.  अमरावतीच्या मातीशी नाते नसतानाही आनंदरावांना अमरावती जिल्ह्य़ाने आल्याआल्याच २00९ च्या  निवडणुकीत खासदार केले. मुंबईत वास्तव्याला असलेले आनंदराव अमरावतीशी फारसे नाते ठेवत नाहीत, अशी  चर्चा त्यांच्याबाबत जिल्हाभरात सातत्याने होत राहिली. दर्यापूर या राखीव मतदारसंघातून मुलाला मिळवून दिलेली  आमदारकी आनंदरावांसाठी त्यांच्या पक्षात जशी भूषणावह बाब होती, तशीच ती पक्षाबाहेर मात्र टिकेचे कारण  ठरली. पेशाने पायलट असलेल्या आमदार अभिजित अडसूळ यांचे सामान्यांना सुरुवातीला आकर्षण होते खरे; परंतु  त्यांचेही वास्तव्य मुंबईला असल्यामुळे अडसूळ पितापुत्र उपलब्धच नसतात, असा तक्रारीचा सूर सर्वसामान्यांच्या  तोंडी सर्वत्र उमटत होता. 
आनंदराव अमरावतीचे नसल्यामुळे त्यांचे नेतृत्त्व स्वीकारणार नाही, अशी शिवसेनेतीलच काही स्थानिक नेत्यांनी  केलेली गर्जना आनंदरावांना अमरावतीच्या मातीतून मिळालेले खुले आव्हान होते. मातोश्रीवर घट्ट पकड ठेवून  आनंदरावांनी जशी महापालिका निवडणुकीच्या काळातील बिकट आव्हाने लिलया पेलली, तशीच त्यांनी संबंधित  सर्व आमदारांच्या मनात जाणीवपूर्वक स्थान निर्माण करून आगामी लोकसभा निवडणुकीच्या आव्हानाची तयारी  बेमालूमपणे फार पूर्वीच आरंभली होती. 
आमदार कुण्याही पक्षाचे असोत, त्यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप न करण्याचा, त्यांच्या साम्राज्याला धक्का लागणार  नाही याची खबरदारी बाळगण्याचा कटाक्ष अडसूळ यांनी सुरूवातीपासून पाळला. त्यामुळे लोकसभा क्षेत्रातील सर्व  आमदारांशी अडसुळांचे मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. केंद्रातील राजकारणाशी घेणेदेणे नसल्याने अडसूळ केंद्रात   मजबूत झालेत तरी काय हरकत, असा विचार सर्वच आमदार करू लागलेत.  अडसुळांनी ज्यावेळी या परिपक्व  राजकीय खेळीचे पत्ते बेमालूमपणे फेकले होते, त्याचवेळी बडनेर्‍याचे आमदार रवी राणा हेदेखील त्यांच्या  अर्र्धांगिणी नवनीत यांच्या लाँचिंगसाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत होते. स्वभाव आणि जनसंपर्क या बाबतीत  अडसुळांच्या तुलनेत कैकपटीने पुढे असलेल्या आमदार रवी राणा यांना लोकसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या  आमदारांना विश्‍वासात घेण्याचे कौशल्य मात्र साध्य करता आले नाही. स्वनेनृत्त्वाला जिल्हाभरात उंची प्रदान  करताना विविध विधानसभा क्षेत्रांतील आमदार दुखावले जात असल्याचे आणि भविष्यात त्याचे गंभीर परिणाम  जाणवू शकतील, असा विचार करण्याचे भान रवी राणा यांना राखता आले नाही. 
केवळ आमदार असूनही आमच्या मतदारसंघात राणा ढवळाढवळ करतात. 
 
 
 

Web Title: The BJP's hard work was successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.