शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा पहिला तर कॉंग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर! मतपत्रिका तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 14:30 IST

Lok Sabha Elections 2024 : सेवा कर्मचाऱ्यांना पाठविल्या : नमुना ७ (अ) ला निवडणूक आयोगाची मान्यता

अमरावती : उमेदवारी अर्जाचा टप्पा आटोपल्यानंतर आता निवडणूक यंत्रणा मतदानाच्या प्रक्रियेच्या तयारीला लागली आहे. यामध्ये सर्वप्रथम नमुना मतपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये उमेदवारांचा मराठी वर्णमालेनुसार क्रम निश्चित करण्यात येऊन आयोगाची मान्यता घेण्यात आली. यामध्ये भाजपाचा उमेदवार पहिल्या, काँग्रेसचा दुसरा व बसपाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहे.        अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी अर्जाची माघार झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली व लगेच रिंगणातील उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मतपत्रिकेसाठी नियमानुसार क्रम निश्चित करण्यात येऊन नमुना ७ (अ) निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला व त्यांच्या मान्यतेनंतर नमुना ७ (अ) प्रसिद्ध करण्यात आला.                  मतपत्रिका व ईव्हीएमवर उमेदवारांचा हाच क्रम राहणार आहे. शिवाय मंगळवारी दुपारी ३ पूर्वी या मतपत्रिका अमरावती लोकसभा मतदारसंघातील मतदार असलेल्या २६८९ सेवा दलातील मतदारांच्या अभिलेख कार्यालयात ‘ईटीपीबीएस’ या यंत्रणेद्वारे पाठविण्यात आलेल्या आहेत. लोकसभेसाठी यावेळी ३७ उमेदवार रिंगणात आहेत व आयोगाने मान्यता दिलेल्या क्रमानुसारच या मतपत्रिका टपाली मतदानासाठी व ईव्हीएमवर राहणार आहेत. शिवाय घरून मतदान करणारे ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदार व दिव्यांग बांधव यांच्या टपाली मतपत्रिकेतही हाच क्रम राहणार आहे.

राष्ट्रीय पक्ष पहिल्यांदा, नंतर प्रादेशिकनमुना ७ (अ) मध्ये सुरुवातीला राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे तीन उमेदवारांचा समावेश आहे, तर त्यानंतर नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या ११ उमेदवारांचा समावेश आहे व त्यानंतर २३ अपक्षांची वर्णी लागली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार क्रम तयार करताना मराठी वर्णमालेचा वापर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.

असा आहे मतपत्रिकेत क्रममतपत्रिकेत राष्ट्रीय पक्ष भाजपाचा उमेदवार पहिल्या क्रमांकावर, काँग्रेसचा दुसरा व बीएसपीचा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या उमेदवारांचा क्रम आहे. यामध्ये चौथ्या क्रमांकावर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक), पाचवा रिपब्लिकन सेना, सहावा अ.भा. परिवार पार्टी, सातवा राष्ट्रीय ओलमा पार्टी, आठवा न. भा. एकता पार्टी, नववा प्रहार, दहावा जनहित पार्टी व ११ व्या स्थानी ऑल इंडिया फारवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार व त्यानंतर २३ अपक्षांचा समावेश आहे. 

टॅग्स :amravati-pcअमरावतीAmravatiअमरावतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४