गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST2021-03-24T04:12:42+5:302021-03-24T04:12:42+5:30
वरूड : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री अनिल देशमुख हे कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात ...

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन
वरूड : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री अनिल देशमुख हे कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपने वरूड शहरातील केदार चौकात आंदोलन केले.
भाजप जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर वानखडे, तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत, शहराध्यक्ष नीलेश बेलसरे, शेंदूरजनाघाट शहराध्यक्ष नीलेश फुटाणे, इंद्रभूषण सोंडे, हितेश तडस, नितीन गुर्जर, नगरसेवक नरेंद्र बेलसरे, देवेंद्र बोडखे, संतोष निमगरे, हरीश कानुगो, किशोर भगत, राजू सुपले, माधुरी भगत, रुपाली सोंडे, सुधीर बेलसरे, नीलेश खासबागे, यशपाल राउत, नितीन देवघरे, रोशन धोंडे, बबलू भोरवंशी, श्रीपाद चांगदे, नीलेश वसुले, रोषण कळमकर, निखील देवघरे, उत्तमराव गाडबैल, मनोज मोरे, दीपक बहुरूपी, ईश्वर कडू, श्याम पाटील, प्रवीण साबळे, मुकेश धोटे, दीपक कोचर, अंकुश घोडसाडे, विशाल आजनकर, रोशन गायकवाड आंदोलनात सहभागी झाले. पोलिसांनी आंदोलकांची अटक करून सुटका केली.