महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपचा विजय
By Admin | Updated: March 10, 2017 00:19 IST2017-03-10T00:19:43+5:302017-03-10T00:19:43+5:30
८७ सदस्यीय महापालिकेच्या सभागृहात १५ व्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेनुरूप ...

महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपचा विजय
संजय नरवणे १५ वे महापौर : संध्या टिकलेंकडे उपमहापौरपद, शहरात जल्लोष
अमरावती : ८७ सदस्यीय महापालिकेच्या सभागृहात १५ व्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेनुरूप एकतर्फी दणदणीत विजय मिळविला. गुरूवारी सकाळी ११ वाजता महापालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. संजय नरवणे आणि संध्या टिकले यांनी प्रत्येकी ५६ मते मिळवून अनुक्रमे महापौर-उपमहापौरपदावर मोहोर उमटविली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले.
४५ सदस्यीय भाजपला शिवसेनेचे ७, युवा स्वाभिमानचे तीन व अपक्ष प्रकाश बनसोड यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे नरवणे आणि संध्या टिकले यांना प्रत्येकी ५६ मते पडली. काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार शोभा शिंदे यांना १५ मतांवर समाधान मानावे लागले तर उपमहापौरपदाच्या भाजपच्या उमेदवार संध्या टिकले यांना ५६, काँग्रेसचे अ. वसीम मजीद यांना १५ तर एमआयएमचे अफजल हुसैन मुबारक हुसेन यांना १० मते मिळालीत.