भाजप अनुसूचित जाती सेलची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:10+5:302021-02-05T05:25:10+5:30
वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा कचेरीसमोर आंदोलन अमरावती : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे या मागणीसाठी साेमवारी भाजप ...

भाजप अनुसूचित जाती सेलची निदर्शने
वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा कचेरीसमोर आंदोलन
अमरावती : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे या मागणीसाठी साेमवारी भाजप अनुसूचित जाती सेलच्या वतीने जिल्हा कचेरी समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले.
अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे याकरिता कृती समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर भाजपने या महाविद्यालयासाठी सतत आंदोलने केली. त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा भाजप अनुसूचित जाती सेलने आंदोलन करीत या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले. यावेळी आंदोलनात भाजप शहराध्यक्ष किरण पातूरकर, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष प्रकाश डोपे, मनीष आत्राम, मनोहर बारसे, मिलिंद नाखले, संध्या टिकिले, निकिता पवार, दादासाहेब वानखडे, सुधीर थोरात,पी.बी.अंभोरे, विजय चव्हाण,राधा कुरील, गंगा अंभोरे,सोनाली नाईक,वंदना हरणे,अनिता राज, इंदू सावरकर व पदाधिकारी तसचे कार्यकर्त्यांचा समावेश होता.