भाजपतर्फे राज्य शासनाविरुद्ध निदर्शने;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:12 IST2021-03-22T04:12:42+5:302021-03-22T04:12:42+5:30
चांदूर बाजार : स्थानिक जयस्तंभ चौकात तालुका भारतीय जनता पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत महाराष्ट्र राज्य शासनाविरुद्ध रविवारी निदर्शने ...

भाजपतर्फे राज्य शासनाविरुद्ध निदर्शने;
चांदूर बाजार : स्थानिक जयस्तंभ चौकात तालुका भारतीय जनता पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत महाराष्ट्र राज्य शासनाविरुद्ध रविवारी निदर्शने केली.
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हकालपट्टी झालेले परमवीर सिंह यांनी राज्याचा गृहमंत्र्यांविरुद्ध गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केले. अटकेतील पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी दिले होते. अशा प्रकारच्या खंडणीबहाद्दर गृहमंत्र्याने राज्याच्या अस्मितेला काळिमा फासली आहे, असा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निषेधाचा सूर होता. या निषेध आंदोलनात भाजप तालुकाध्यक्ष मुरली माकोडे, सरचिटणीस गोपाल तिरमारे, अंनत भारतीय, मिलिंद चुके, महिला अध्यक्ष जयश्री पंडागडे, अर्चना पंडागडे, आशिष कोरडे, नीलेश देशमुख, गजानन राऊत, सुधीर निभोंरकर, कैलास आमझरे, बंडू अर्डक, अभिजित सूर्यवंशी, प्रतीक सावरकर, मोहन इंगळे, अतुल दाऱोकार, मोंटू दाभाडे, नितीन टाकरखेडे, नंदू माहुरे, विजु कुऱ्हेकर, नगरसेविका मीरा खडसे, माधुरी साबळे, पूनम उसरबरसे, संजय लोणारकर, सचिन बोबडे, विशाल रडके, अक्षय रडके, प्रणित खवले, पुनम उटाळे, रूपाली उटाळे, चंदा जोशी, दीपा गोंचवडे, संजय थेलकर, सचिन तयावाडे, रीतेश चाफळे, एकनाथ राऊत, राज चव्हाण आदी सहभागी झाले.