प्रक्रिया मतदारसंघावर भाजपचा कब्जा
By Admin | Updated: November 17, 2015 00:14 IST2015-11-17T00:14:39+5:302015-11-17T00:14:39+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रक्रिया प्रतिनिधी मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे पंढरीनाथ महादेव बेसेकर हे २३ मतांनी विजयी झाले...

प्रक्रिया मतदारसंघावर भाजपचा कब्जा
बाजार समिती : पंढरी बेसेकर यांचा २३ मतांनी विजय
धामणगाव रेल्वे : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रक्रिया प्रतिनिधी मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे पंढरीनाथ महादेव बेसेकर हे २३ मतांनी विजयी झाले तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार हेमंत कडू यांना १४ मते मिळालीत.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी- विक्री विकास व विनियमन १९६३ मधील कलम १३ अन्वये पणन मंडळाच्या एका प्रक्रिया प्रतिनिधी पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. ३७ मते असलेल्या या मतदारसंघात भाजपच्यावतीने पंढरीनाथ बेसेकर यांनी तर काँग्रेस तर्फे हेमंत गुणवंत्त कडू यांनी अर्ज दाखल केला. यात पंढरीनाथ बेसेकर २३ मते मिळवून विजयी झाले़
बाजार समिती भवनात झालेल्या निवडणुकीनंतर बेसेकर यांचा भाजप नेते अरूण अडसड, सहकार नेते विजय उगले, भाजयुमोचे प्रताप अडसड, बाजार समिती सभापती मोहन इंगळे, उपसभापती दुर्गाबक्षसिंंह ठाकूर, संचालक रामदास निस्ताने, प़ंस़ सभापती राजनकर, उपसभापती अतुल देशमुख यांनी केले़