शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

माजी कृषिमंत्री अनिल बोंडेंना तीन महिने कारावासाची शिक्षा; नेमके प्रकरण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2022 17:23 IST

२०१६ मध्ये अनिल बोंडे यांनी वरुडच्या तहसीलदारांना त्यांच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ व मारहाण केली होती. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध खटला सुरू होता.

ठळक मुद्दे१० हजार रुपये दंडअमरावती जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

अमरावती : नायब तहसीलदाराला मारहाण व शिवीगाळ प्रकरणात राज्याचे माजी कृषिमंत्री व भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने तीन साधा महिने कारावास व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.  तसेच, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षाही ठोठावली आहे. याप्रकरणी आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे बोंडे म्हणाले.

वरूड तहसील कार्यालयात ३० सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी ही घटना घडली होती. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध खटला सुरू होता. ज्याचा निकाल आज आला असून त्यात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजनेत एकूण २४० प्रकरणांमध्ये त्रुटी काढल्यामुळे वरुडचे नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना जाब विचारण्यासाठी बोंडे हे कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालय धडकले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला व बोंडे यांनी तसहसीलदारांना धमकी देत, शिवीगाळ व मारहाण केली होती. तसेच शासन निर्णयाची प्रत व फाईल फाडून टाकली होती. 

याबाबत तहसीलदार काळे यांनी वरुड पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. व ११ मे २०१७ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.त्या प्रकरणाची आज सुणावणी होती. यावेळी जिल्हा न्यायालयाने त्यांना कलम ३३२ अंतर्गत ३ महिन्यांचा साधा कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे यावेळी डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

आठ साक्षीदार तपासले

सहायक सरकारी वकील मिलिंद जोशी यांनी एकुण आठ साक्षीदार तपासले. अभियोग पक्षाने तपासलेला साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरून आरोपी अनिल बोंडे यांना कलम ३३२ व ५०४ अन्वये दोषी धरले. दोन्ही कलमांन्वये अनिल बोंडे यांना शिक्षा ठोठावण्यात आली. कोर्ट पैरवी राजेंद्र बायस्कर यांनी केली. अंमलदार अरुण हटवार यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयAnil Bondeअनिल बोंडेCrime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती