भाजपच्या आशा पल्लवित; काँग्रेस सावध
By Admin | Updated: January 6, 2017 00:23 IST2017-01-06T00:23:46+5:302017-01-06T00:23:46+5:30
नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच गेली अनेक

भाजपच्या आशा पल्लवित; काँग्रेस सावध
निवडणूक : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी व्यूहरचना
अमरावती : नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपाच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच गेली अनेक वर्षे पारंपारिक बालेकिल्यात फटका बसल्याने काँग्रेसचे नेते आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अधिक सावध झाले आहेत. काँग्रेसची पिछेहाट होत असताना ती जागा भरून काढता येईल का, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. तर भाजपाकडून कशी सन्मानाची वागणूक मिळते या प्रतिक्षेत शिवसेना आहे.
लातूर जिल्हा परिषदेत स्थापनेपासून काँग्रेसची सत्ता आहे. काही वेळा राजकिय परिस्थितीमुळे विरोधकांचे केवळ संख्याबळ वाढले. मात्र त्यांना सत्वेचा सोपान गाठता आला नाही. सद्याच्या जिल्हा परिषदेत ५९ सदस्यांपैकी २५ सदस्या एकट्या काँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, भाजप ९, शिवसेना ८, बसपा २, रिपाइं १, प्रहार ४, जनसंग्राम २, अपक्ष १ सदस्य आहेत. तर १४ पंचायत समितीमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षाचे सभापती आहेत. देशात व राज्यात भाजपाची सत्ता, नगरपालिका निवडणुकीत जनतेने भाजपाच्या बाजूने दिलेला कौल पाहता जिल्हा परिषद व पंचायत समितीत सत्तास्थापनेसाठी भाजपाची मंडळी वेगवेगळ्या व्यूहरचना आखत आहेत. प्आगामी निवडणुकीत एकदिलाने काम झाले तर भाजपाची सत्ता येऊ शकते, असा विश्वास भाजपाचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. या निवडणुकीदरम्यान युतीबाबतचे चित्र मात्र अस्पष्ट आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे, तर काँग्रेस पक्षाने नगरपालिकेतील निकालाची दखल घेत सावधतेचा पवित्रा घेत आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढवून जि. प., पं. स.च्या निवडणुकीत सत्तेची परंपरा या स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकविण्याची काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. (प्रतिनिधी)