सहकारी संस्थेवर भाजपाचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 00:02 IST2016-08-01T00:02:03+5:302016-08-01T00:02:03+5:30
निंबोली विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुकीत बाराही जागांवर विजय मिळवून भाजपने विजयाची परंपरा कामय ठेवली तर काँग्रेस गटाचा धुव्वा उडाला आहे़

सहकारी संस्थेवर भाजपाचे वर्चस्व
निंबोलीत बाराही जागांवर विजय : काँग्रेस गटाचा धुव्वा
मंगरूळ दस्तगीर : निंबोली विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुकीत बाराही जागांवर विजय मिळवून भाजपने विजयाची परंपरा कामय ठेवली तर काँग्रेस गटाचा धुव्वा उडाला आहे़
मागील ५१ वर्षांपासून या सहकारी संस्थेवर गोपाळराव औरंगपूरे यांच्या गटाचे वर्चस्व होते ते वर्चस्व या निवडणूकीतही भाजपाचे विनोद औरंगपुरे यांनी कायम ठेवले़ सर्वच जागेवर आपल्या उमेदवारांना विजय मिळवून दिला आहे़ काँग्रेसच्या पावडे व पांडे या गटाचा पराभव झाला.
निवडणुकीत भाजपच्या शेतकरी शेतमजूर सहकारी पॅनेलचे सर्व साधारण मतदार संघात विनोद गोपाळ औरंगपूरे, कृष्णा केशव नाकाडे, जानराव शामराव गेडाम, विनोद अवधुत ठाकरे, विठ्ठल रामराव कावरे, दिगांबर भिमराव भोसले, उत्तम चिंधुजी पाचभावे, गजानन बालाजी माहुलकर तर नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून बाबाराव नारायण वानखडे, अनुसूचित जाती प्रवर्गातून सुनिल विश्वनाथ ढाणके, महिला गटातून कल्पना भाष्कर भोंगे, मंदा शरद दौड,उमेदवार विजयी झाले आहे़ त्यांचा गौरव भाजपाचे नेते अरूणभाऊ अडसड यांनी केला. यावेळी प़स़सदस्या वनिता अशोक राऊत, भाजपा तालुकाध्यक्ष राजू गावंडे यांची उपस्थिती होती़
या अटीतटीच्या निवडणूकीसाठी भाजपाचे कार्यकर्ते भानुदास भोंगे, दिनेश वैरागडे, प्रभाकर चव्हाण, गुणवंत दौड, प्रतीक भोेंगे, योगीराज ढाणके, विकास गभणे, देविदास पाचभावे, मंगेश सोनवणे, उदय बोरबळे, अरूण औरंगापुरे, प्रभाकर भोंगे, विठोबा चव्हाण, राजेंद्र भोंगे, नरेश भारसाकळे, बाबासाहेब भैस, सुनिल काळे, नारायण गोटमारे, यादव भारसाकळे, बंन्टी भोंगे, किरण नेवारे, अशोक सावंत, रामसिंग बैस, शेैलेश गोटमारे, रामराव ढाणके, विठ्ठल निशांत, कृष्णा काळे, अरविंद गरड, रंगराव गेडाम, विठ्ठल भोयर, रमेश पवार, बबलु निकम, श्रीकृष्ण बडगे, सुभाष पनपालीया, रवी कडू, रवींद्र मोटे, प्रकाश देव्हारे, विनोद नैताम यांनी अथक परिश्रम घेतले़