अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : स्वस्त धान्य पुरवठ्याची मागणीअमरावती : जिल्ह्यातील गोरगरिबांसाठी येणाऱ्या धान्याचे वाटप झाले नसल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दिले होते. परंतु हे आश्वासन हवेतच विरल्याचा आरोप करुन सोमवारी भाजपाच्या वतीने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी गरिबांची शिदोरी भेट देऊन संताप व्यक्त केला.मागील आठ महिन्यापूर्वी भाजपाने हे आंदोलन करीत नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१३ मध्ये गरिबांना धान्य उपलब्ध झाले नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. परंतु अनेक दिवस लोटूनही चौकशीत काय स्पष्ट झाले याबाबत सत्यता बाहेर आली नाही. तर दुसरीकडे अन्न सुरक्षा विधेयकांतर्गत अनेक कुटुंबांना धान्य मिळणेच बंद झाले आहे. जिल्ह्यातील अनेक आश्रम शाळांचा धान्यपुरवठादेखील बंद आहे. जिल्ह्यात स्वस्त धान्याची एवढी गंभीर स्थिती असताना सत्ताधारी कुठलीही गंभीर दखल घेत नाही, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय यांनी केला आहे. दरम्यान अपर जिल्हाधिकारी किशोर कामुने यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून याबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शहर अन्न धान्य वितरण अधिकारी शरद देशपांडे उपस्थित होते. आंदोलनात भाजपा शहर अध्यक्ष तुषार भारतीय, साहेबराव तट्टे, किरण महल्ले, सुरेखा लुंगारे, संजय अग्रवाल, राजू कुरील, राधा कुरील, चेतन गावंडे, प्रशांत शेगोकार, गंगा खारकर, पी.जे. नगरकर, भारत चिखलकर, दीपक खैरकर, शिवानी आवटे, लविना हर्षे, अनिल आसलकर, संजय तिरथकर व भाजपा अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाजपचे जिल्हा कचेरीवर ‘शिदोरी’ आंदोलन
By admin | Updated: July 7, 2014 23:20 IST