बियाणीची श्रेया अव्वल

By Admin | Updated: May 28, 2015 00:23 IST2015-05-28T00:23:03+5:302015-05-28T00:23:03+5:30

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला.

Biyani's Character top | बियाणीची श्रेया अव्वल

बियाणीची श्रेया अव्वल

अमरावती जिल्ह्याचा निकाल ९१.३३ टक्के : विभागात १ लाख १७ हजार ८६२ विद्यार्थी उत्तीर्ण
अमरावती : महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये शहरातील ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रेया जयदीप मांडवगडे ही ९७.३८ टक्के गुणांसह जिल्हातूनच नव्हे तर अमरावती विभागातून अव्वल ठरली आहे. यंदाही जिल्ह्यात बारावीच्या निकालामध्ये मुलींचाच वरचष्मा आहे. जिल्ह्यातून ९४.६५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.
ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाचाच विज्ञान शाखेचा विद्यार्थी हृषीकेश पतंगराव याने ९६.७६ टक्के गुणांसह जिल्ह्यातून गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकाविला तर श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वरांगी टिंगणे ही ९६.६५ टक्के गुणांसह तृतीय स्थानी आली. गेल्या वर्षी या महाविद्यलयातून २६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते.
श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा निकाल ९९.५८ टक्के लागला असून या महाविद्यालयाचा विद्यार्थी रूपेश वानखडे याने ९५.६६ टक्के, एम.पी. बानाईत याने ९५.२६ टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे विद्याभारती महाविद्यालयाचा निकाल ८७.७७ टक्के लागला असून या महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी ९१.९७ टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आली आहे.

सर्वांच्या मदतीनेच यशाची परपंरा
ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाच्या यशाची पंरपंरा सर्वाच्याच मदतीने मिळाली आहे. मी केवळ निमीत्त मात्र, आहे. विद्यार्थ्यांंच्या अभ्यासक्रमाकडे विशेष लक्ष देऊन त्यांना हवी तशी मदत करण्याचे कार्य सर्वांनीच केले. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक बारिकसारिक गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांना कशी मदत हवी याकडे सर्वाधिक लक्ष ठेवण्यात आल्यानेच महाविद्यालयाची प्रगतीकडे वाटचाल केली आहे. मुलांना हुशार असल्याचे सांगण्यापेक्षा तुम्ही काय काय चुका करता याबद्दल अवगत करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या चुकाचे समाधान करण्यात आले आहे. आमच्या महाविद्यालयील मुले अभ्यासात चांगले आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी सर्वाच्याच मदतीने यश संपादन केले आहे. असे मत ब्रिजलाल बियाणी विज्ञान कनीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस.बी. लोहिया यांनी व्यक्त केले.

Web Title: Biyani's Character top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.