झेडपीतील कर्मचाऱ्यांची आता बायोमेट्रिक हजेरी

By Admin | Updated: February 11, 2016 00:25 IST2016-02-11T00:25:32+5:302016-02-11T00:25:32+5:30

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची आता बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येणार असून कार्यालयीन कामकाजाच्या वेळी गप्पा करणाऱ्या ..

Biometric attendance of ZP employees now | झेडपीतील कर्मचाऱ्यांची आता बायोमेट्रिक हजेरी

झेडपीतील कर्मचाऱ्यांची आता बायोमेट्रिक हजेरी

सीईओंचे आदेश : अधिकाऱ्यांनाही द्यावी लागणार दौऱ्याची पूर्वसूचना
अमरावती : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची आता बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येणार असून कार्यालयीन कामकाजाच्या वेळी गप्पा करणाऱ्या आणि अधिकाधिक वेळ पानटपऱ्या किंवा चहाच्या कँटीनवर घालविणाऱ्यांवर यामुळे वचक निर्माण होणार आहे. इतकेच नव्हे तर अधिकाऱ्यांनाही जिल्ह्याच्या बाहेर कार्यालयीन दौऱ्यावर जायचे असल्यास सीईओंची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. सीईओंनी बुधवारी सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलावून उपरोक्त आदेश निर्गमित केल्याने जि.प. वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बुधवारी लोेकमतने जि.प. परिसरातील सर्व विभागांचे निरीक्षण करून ‘झेडपीत कार्यालयीन वेळेत शुकशुकाट’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रकाशित केले होते.

मनमौजी कर्मचाऱ्यांवर बसणार वचक
अमरावती : यामुळे जि.प. प्रशासनाला खडबडून जाग आली आणि तडकाफडकी बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. सीईओ सुनील पाटील यांनी डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे यांना हे आदेश दिलेत. विविध कामानिमित्त जिल्हा परिषदेत येणाऱ्या अभ्यागतांना जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी वेळेवर भेटत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार नेमका चालतो कसा? याबद्दल सामान्यांना उत्सुकता असते. १४ विभाग अन् हजारो कर्मचाऱ्यांचा येथे डोलारा आहे. पण, झेडपीच्या आवारातील विविध विभागात कामाच्या तासांमध्ये कर्मचारी चहाकरिता, पान टपरीवर गेलेले कर्मचारी दिसून येतात यामुळे ग्रामिण भागातून कामासाठी येणाऱ्या नागरिकांना तासन्तास ताटकळत बसावे लागते. परिणामी वेळेपर्यंत संबंधित कर्मचारी भेटत नाहीत. अशावेळी नागरिकांना कामाविनाच परत जावे लागते. त्यामुळे या प्रकाराला आळा बसणे आवश्यक आहे. याबाबत लोकमतने जि.प.च्या सर्व विभागांना भेटी देऊन निरीक्षण नोंदविले. आणि याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच जिल्हा परिषद प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन, पंचायत, महिला व बालकल्याण, समाज कल्याण, वित्त, बांधकाम, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, सिंचन आदी विभागाच्या खातेप्रमुखांची संयुक्त बैठक घेतली. सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत कामाचे ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिलेत. कार्यालयीन वेळेत कुठल्याही कर्मचाऱ्यांनी खासगी कामे करू नयते, अथवा बाहेर फिरू नये, असा प्रकार आढळल्यास यापुढे शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देशही सीईआेंनी खाते प्रमुखांना दिले आहेत. याशिवाय सर्व विभागात तातडीने बॉयोमेट्रिक मशीन देखील लावण्यात येणार आहेत. सर्व खातेप्रमुखांना त्यांच्या विभागातील संपूर्ण कर्मचारी हजर आहेत किंवा नाही, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
अधिकाऱ्यांनाही घ्यावी लागणार पूर्वपरवानगी
जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांसोबतच अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर दौऱ्यासाठी जाताना सीईओंची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय कुणीही मुख्यालय सोडू नयेत, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी दिले आहेत.

अधिकाऱ्यांनी जारी केले ताकिदपत्र
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या खातेप्रमुखांनी त्यांच्या अधिनस्थ सर्व कर्मचाऱ्यांनी शासकीय वेळेनुसार कार्यालयात यावे आणि कार्यालयीन वेळेत कुणीही बाहेर जाणार नाही, याची दक्षता घ्यावी अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल, असे ताकिदपत्र जारी केले आहे.

आता अधिकारी, कर्मचाऱ्यांची बॉयोमेट्रीक हजेरी होईल. सोबतच हजेरीपत्रकावर कार्यालय सोडण्याच्या नोंदी ठेवल्या जातील.अधिकाऱ्यांनीही पूर्व परवानगी न घेता जिल्ह्याबाहेर जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.
-सुनील पाटील, सीईओ, जि.प.

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातून कामासाठी येणाऱ्या अभ्यागताना वेळेवर कर्मचारी भेटत नाहीत. यातही सुधारणा व्हावी. याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
-सतीश उईके, अध्यक्ष, जि.प.

Web Title: Biometric attendance of ZP employees now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.