जैवविविधता दिवसाच्या कार्यक्रमात वन्यप्रेमींकडून निषेध

By Admin | Updated: May 23, 2016 00:15 IST2016-05-23T00:15:23+5:302016-05-23T00:15:23+5:30

छत्री तलाव रोडवरील सामाजिक वनिकरणाचे जैवविविधता उद्यान वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी अडथळा निर्माण करीत असल्याने उद्यानाचे तारेचे कुंपण काढण्यात यावे,

Biodiversity protest from wildmakers in the day-to-day program | जैवविविधता दिवसाच्या कार्यक्रमात वन्यप्रेमींकडून निषेध

जैवविविधता दिवसाच्या कार्यक्रमात वन्यप्रेमींकडून निषेध

वन विभागात खळबळ : तारेचे कुंपण काढण्याची मागणी
अमरावती : छत्री तलाव रोडवरील सामाजिक वनिकरणाचे जैवविविधता उद्यान वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी अडथळा निर्माण करीत असल्याने उद्यानाचे तारेचे कुंपण काढण्यात यावे, अशी मागणी घेऊन रविवारी मधूबन वन्यजीव संरक्षण संस्थेचे नीलेश कंचनपुरे यांनी वनविभाग कार्यालयातील जैवविविधता दिनानिमित्तच्या कार्यक्रमात निषेध नोंदविला. त्यामुळे काही वेळाकरिता कार्यक्रमात विघ्न आले होते.
गर्ल्स हायस्कूलजवळ असणाऱ्या वन विभागाच्या कार्यालयात रविवारी सकाळी जैवविविधता दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात गोंधळ
अमरावती : या कार्यक्रमात जिल्हाधिकारी किरण गित्ते, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसरंक्षक दिनेश त्यागी, उपवनसरंक्षक निनु सोमराज, राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य किशोर रीठे, वक्ते जी.एन.वानखेडे, मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर, जिल्हा जैवविविधता समितीचे सदस्य गजानन वाघ, मत्स व्यवसाय अधिकारी सु.ना.सुखदेवे, वनराईचे अध्यक्ष मधू धारड, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी जैवविविधतेवर प्रकाश टाकीत, ती कशी टिकूव शकतो. यावर मागदर्शन केले. दरम्यान वन्यप्रेमी निलेश कंचनपुरे यांने कार्यक्रमातील मंचावर प्रवेश करून निषेध नोंदविणारे भाष्य केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कंचनपुरेला आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठावर बोलाविले. कंचनपुरेने उद्यानाचा मुद्दा मांडून वन्यप्राण्याबद्दल आत्मीयता दाखवून उद्यानाचे तारेची कुंपण काढण्याची मागणी वनविभागाकडे केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कंचनपुरेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.व्ही. पडगव्हाणकर, मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर, मधू घारड यांच्यासह काही अधिकाऱ्यांना छत्री तलावाजवळील उद्यानाची पाहणी करण्याकरीता पाठविले होते. त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरु करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत वऱ्हेकर तर आभार उपवनसरंक्षक निनु सोमराज यांनी मांनले. (प्रतिनिधी)

Web Title: Biodiversity protest from wildmakers in the day-to-day program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.