शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात उसळला आगडोंब कोट्यवधींचा खर्च कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

दरवर्षी उन्हाळ्यात अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलांसह वन विभागाच्या संरक्षित जंगलात आग लागल्याने हजारो हेक्टर जंगल जळून राख होते. संबंधित विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि उपाययोजना केल्यानंतरही आगडोंब थांबलेला नाही. आता व्याघ्र प्रकल्पाच्या परिसराचा विस्तार झाला. अतिसंरक्षित परिक्षेत्रात येणाऱ्या गावांचे पुनर्वसनसुद्धा केले जात आहे. तरीदेखील मेळघाटातील जंगलात आगडोंब उसळत असल्याचे विदारक चित्र पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचा विषय ठरला आहे.

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटातील घटांग, गाविलगड, रायपूर आणि जामली खोंगडा वनपरिक्षेत्रील जंगलात आगडोंब उसळला आहे. सोमवारी रात्री ९ वाजता अंधारातही हरिकेन पॉइंट खोऱ्यातील आगीची धग दुरूनच दिसून येत होती. वनअधिकारी, कर्मचारी, वनमजूर आग विझविण्यासाठी रात्रीपासूनच जंगलात असल्याची माहिती आहे. जवळपास पाचशे हेक्टर जंगल जळाल्याची माहिती आहे.दरवर्षी उन्हाळ्यात अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलांसह वन विभागाच्या संरक्षित जंगलात आग लागल्याने हजारो हेक्टर जंगल जळून राख होते. संबंधित विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि उपाययोजना केल्यानंतरही आगडोंब थांबलेला नाही. आता व्याघ्र प्रकल्पाच्या परिसराचा विस्तार झाला. अतिसंरक्षित परिक्षेत्रात येणाऱ्या गावांचे पुनर्वसनसुद्धा केले जात आहे. तरीदेखील मेळघाटातील जंगलात आगडोंब उसळत असल्याचे विदारक चित्र पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचा विषय ठरला आहे.जामली खोंगडा परिक्षेत्रांतर्गत महादेव घसरण परिसर व जामली वनपरिसरातील जंगलातील आग आटोक्यात आणण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अभय चंदेल व दिनेश वाळके, वनपाल वनरक्षक व मजूर अंगारी यांच्यासह तळ ठोकून असल्याचे सांगण्यात आले. या आगी हेतुपुरस्सर लावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पूर्वी बांबूच्या घर्षणाने याआधी आगी लागत असल्याचे सांगितले जात होते; परंतु गेल्या काही वर्षांत मोहफुले, तेंदूपाने, गुरांचा चारा, बारसिंगाच्या मोहात आगी लावण्यात येतात. 

ब्रीदाच्या कोसो दूर समित्या?संयुक्त वन व्यवस्थापन आणि श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजना अशा दोन वेगवेगळ्या समित्या प्रत्येक आदिवासी गावात कार्यान्वित आहेत. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, आगीपासून जंगलाचे संरक्षण हेच या समित्यांचे ब्रीद आहे. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च विविध उपक्रम आणि साहित्यासाठी वन आणि व्याघ्र प्रकल्प अंतर्गत केला जातो; परंतु आग विझविण्यासाठी आदिवासी पुढे येत नसल्यामुळे वन आणि व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी हतबल आहेत. 

 

टॅग्स :Melghatमेळघाटfireआग