महापलिकेवर वीज देयकाचे साडेचार कोटी रुपये थकीत
By Admin | Updated: May 15, 2015 00:06 IST2015-05-15T00:06:43+5:302015-05-15T00:06:43+5:30
शहरातील साडेआठ लोकसंख्येच्या मूलभूत सोईसुविधांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या महापालिका प्रशासनावर वीज देयकाचे साडेचार कोटी रुपये थकीत आहे.

महापलिकेवर वीज देयकाचे साडेचार कोटी रुपये थकीत
अमरावती : शहरातील साडेआठ लोकसंख्येच्या मूलभूत सोईसुविधांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या महापालिका प्रशासनावर वीज देयकाचे साडेचार कोटी रुपये थकीत आहे. ही रक्कम त्वरित भरावी, अन्यथा वीजपुरवठा कपात केला जाईल, अशा सूचना वीज वितरण कंपनीने प्रशासनाला दिल्या आहेत. परिणामी वीज देयकाची रक्कम अदा करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरु झाल्याचे चित्र आहे.
पाणीपुरवठा, वीज, पुरवठादार, कंत्राटदार, सदस्यांचे मानधन, इंधन देयके अशा एक ना अनेक समस्यांचा सामना महापालिकेला करावा लागत आहे. एलबीटीचे उत्पन्न काहीअंशी वाढले तरी सध्या महिन्याकाठी साडेसहा लाख रुपयांच्या वर तिजोरीत पैसे जमा होत नसल्याचे वास्तव आहे. ही रक्कम वेतनसाठीच अपुरी पडत असल्याने मूलभूत सोईसुविधा कशा पुरवाव्यात, असा प्रश्न आयुक्तांपुढे निर्माण झाला आहे. तिजोरीत एलबीटीची रक्कम जमाव होताच सफाई कर्मचारी, सेवानिवृत्ताचे वेतन देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. नऊ महिन्यांपासून दैनदिंन सफाई कर्मचाऱ्यांची देयकांची मागणी असताना याकडे कोणीही गांभिर्याने लक्ष देत नसल्याची ओरड आहे. आयुक्त गुडेवार हे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करीत असले तरी उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक ही परिस्थिती महापालिकेत आहे. वीज वितरण कंपनीनने वीजपुरवठा करण्याच्या सूचना केल्याने पाचही झोन, मुख्य कार्यालय, शिक्षण विभाग, अग्निशमन, पाणीपुरवठा विभागाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास वावगे ठरु नये, असे बोलले जात आहे. वीज देयकाचे मार्चपर्यत दोेन कोटी ३० लाख रुपये थकीत होते. परंतु एप्रिल महिन्यात वीजेचा वापर वााढल्याने ही रक्कम एप्रिलमध्ये साडेचार कोटींवर पोहचली आहे. ही रक्कम वेळेत अदा करण्यात यावी, अन्यथा वीजपुरवठा खंडीत करु, अशी नोटीस बजावली.