विधी समिती सभापतिपदी बिल्कीसबानो बिनविरोध

By Admin | Updated: December 10, 2015 00:28 IST2015-12-10T00:24:53+5:302015-12-10T00:28:20+5:30

महानगरपालिका विधी समिती सभापती पदाकरिता बुधवारी निवडणूक घेण्यात आली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचे

Bilkisbano is elected unanimously as Chairman of the Legislative Committee | विधी समिती सभापतिपदी बिल्कीसबानो बिनविरोध

विधी समिती सभापतिपदी बिल्कीसबानो बिनविरोध

अमरावती : महानगरपालिका विधी समिती सभापती पदाकरिता बुधवारी निवडणूक घेण्यात आली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचे अध्यक्षतेखाली सुदामकाका देशमुख सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत विधी समिती सभापतीपदी बिल्कीसबानो हमजाखान यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. स्थायी समिती सभापती विलास इंगोले, गटनेता अविनाश मार्डीकर, झोन सभापती मिलिंद बांबल, विधी समिती उपसभापती सुनीता भेले, नगरसेवक अरूण जयस्वाल, हमीद शद्दा, भरत चव्हाण, नगरसेविका अंजली पांडे, कुसूम साहु, माजी नगरसेवक रतन डेंडूले, सादीक आयडीया, मनोज भेले, नदीम अहेमद आदींनी बिल्कीसबानो यांच्या निवडीबद्दल कौतुक केले. गवळीपुरा प्रभाग क्र. २६ च्या पोटनिवडणुकीत त्या विजयी झाल्या आहेत. निवडीनंतर त्यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली, हे विशेष. (प्रतिनिधी)

Web Title: Bilkisbano is elected unanimously as Chairman of the Legislative Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.