कॉर्टन मार्केट जवळून दुचाकी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:13 IST2021-01-23T04:13:04+5:302021-01-23T04:13:04+5:30
अमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील कॉर्टन मार्केटजवळून ३० हजार रुपये किमतीची एमएच २७ एमएच २७ बीआर १२७० क्रमांकाची दुचाकी ...

कॉर्टन मार्केट जवळून दुचाकी चोरी
अमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील कॉर्टन मार्केटजवळून ३० हजार रुपये किमतीची एमएच २७ एमएच २७ बीआर १२७० क्रमांकाची दुचाकी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना बुधवारी घडली. फिर्यादी चंद्रप्रकाश संजय पिंगळे (२२, रा. म्हाडा कॉलनी, साईनगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
-------------------------------------------------------------
डोक्यावर बांबूने मारून जखमी
अमरावती : क्षुल्लक कारणावरून एका युवकाला डोक्यावर बांबूने मारून जखमी केल्याची घटना बुधवारी तपोवन येथील न्यू साई कॉलनीत घडली. शिवा चौकीदार ( रा. तपोवन गेटच्या आत) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी गजानन किसनराव तिडके (३०, रा. दहिगाव पूर्णा ता. चांदूर बाजार) असे जखमीचे नाव असून, त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला.
-----------------------------------------------------------------------------
सोपेचे कट्टे लंपास
अमरावती : पांढरकवडा येथील एका प्रतिष्ठानाला फिर्यादीने विकलेले सहा हजार रुपये किमतीचे सोपेचे कट्टे अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना सक्करसाथ येथे गुरुवारी घडली. याप्रकरणी फिर्यादी गणेश चंदूलाल अग्रवाल (६०, रा. गणेश कॉलनी) यांनी खोलापुरीगेट ठाण्यात तक्रार नोंदविली. पोते चोरीत असल्याचे येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.