सेलिब्रेशन लॉन कोविड सेंटरमधून दुचाकी चोरी (सारांश)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST2021-01-19T04:16:17+5:302021-01-19T04:16:17+5:30
---------------------------------------------- शिराळा येथे बैल चोरी अमरावती : वलगाव ठाणे हद्दीतील शिराळा येथून २० हजार रुपये किमतीचा बैल अज्ञात आरोपीने ...

सेलिब्रेशन लॉन कोविड सेंटरमधून दुचाकी चोरी (सारांश)
----------------------------------------------
शिराळा येथे बैल चोरी
अमरावती : वलगाव ठाणे हद्दीतील शिराळा येथून २० हजार रुपये किमतीचा बैल अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना १६ जानेवारी रोजी घडली.
फिर्यादी संजय त्र्यंबकराव भोवाळू (५५, रा. शिराळा) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे.
-----------------------------------------------------------
आष्टी येथून ३८ हजारांची जनावरे चोरी
अमरावती : वलगाव ठाणे हद्दीतील आष्टी येथून अज्ञात आरोपीने ३८ हजार रुपये किमतीची तीन जनावरे चोरून नेल्याची घटना १६ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी पोलिसानी रविवारी गुन्हा नोंदविला आहे.
फिर्यादी नरेश दत्तात्रय जुवार (५२, रा. आष्टी) यांनी वलगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
-----------------------------------------
मंदिरातील दानपेटीतून तीन हजार लंपास
अमरावती : वलगाव ठाणे हद्दीतील साऊर येथील अग्निशेष मंदिरातून अज्ञात आरोपीने दानपेटीमधील तीन हजार रुपये लंपास केल्याची घटना १६ जानेवारी रोजी घडली. फिर्यादी निखील विलासराव निमकर (२८, रा. साहूर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.
--------------------------------------------------------------------------