बिजिलँडमधील कर्मचाऱ्यावर हल्ला
By Admin | Updated: November 15, 2014 22:38 IST2014-11-15T22:38:21+5:302014-11-15T22:38:21+5:30
चारचाकी वाहनाचा दुचाकीला धक्का लागल्याच्या वादातून विशिष्ट समुदायातील १५ तरूणांनी शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ येथील बिजिलँड व्यापारी संकुलातील दोन

बिजिलँडमधील कर्मचाऱ्यावर हल्ला
तिघे जखमी : वाहनाचा धक्का लागल्याने वाद
अमरावती : चारचाकी वाहनाचा दुचाकीला धक्का लागल्याच्या वादातून विशिष्ट समुदायातील १५ तरूणांनी शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ येथील बिजिलँड व्यापारी संकुलातील दोन युवकांवर हल्ला चढविला. या घटनेमुळे व्यापारी संकुल परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
या हाणामारीत प्रफुल्ल दिनकर गवळी (२२) नामक तरूण जखमी झाला. तर मध्यस्थी करण्यासाठी गेलेले शंकर सुधाकर भोपळे (२०), अमोल सावरकर (२३) व आशिष रामदास भोपळे (२३), (सर्व रा. नांदगाव पेठ) किरकोळ जखमी झाले आहेत.
शनिवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान प्रफुल्ल गवळी, शंकर भोपळे, अमोल सावरकर व आशिष भोपळे हे चौघेही पंचवटी चौकाकडून नांदगाव पेठकडे दोन दुचाकींनी जात होते. याचवेळी त्याच मार्गाने मिनीबस एमएच २७-ए-९७५१ ही सिटीलॅन्डच्या काही कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती. दरम्यान पंचवटी चौकात प्रफुल्लच्या दुचाकीला मिनीबसचा धक्का लागला.
यावरून मिनीबस चालक मोहम्मद नासीर मोहम्मद रफीक (२८) यांने प्रफुल्लसोबत वादावादी करून शिवीगाळ केली. थोड्यात वेळात दोघांमधील वाद संपला. परंतु मो.नासीरच्या मनात खदखद होतीच.