सामाजिक संस्थांना एकत्र आणणे मोठे कार्य
By Admin | Updated: June 6, 2017 00:10 IST2017-06-06T00:10:04+5:302017-06-06T00:10:04+5:30
सामाजिक संस्थांना एकत्र आणणे हे मोठे कार्य आहे. लोकसहभागातून प्रचंड कामे यशस्वी होतात. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना गौरविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

सामाजिक संस्थांना एकत्र आणणे मोठे कार्य
पालकमंत्री : १२० सामाजिक संस्थांच्या कार्याचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सामाजिक संस्थांना एकत्र आणणे हे मोठे कार्य आहे. लोकसहभागातून प्रचंड कामे यशस्वी होतात. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना गौरविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. गोसंवर्धनातून शेतीचा मोठा लाभ होतो. त्यामुळे अशा संस्थांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केले.
ते गोकुलम गौरक्षण संस्थेच्यावतीने आयोजित १२० साामाजिक संस्थांच्या गौरख कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या शंभरावर संस्थांचा रविवारी गोकुलम गोरक्षणमध्ये त्यांनी गौरव केला. ज्येष्ठ समाजसेवक लप्पीसेठ जाजोदिया यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार आनंदराव अडसूळ, आ.यशोमती ठाकूर, नवनीत राणा, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, हेमंत मुरके, चंद्रकुमार जाजोदिया, अजय आर्य, विष्णू भुतडा, समाजसेवक गोविंद कासटसह मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. गौकुलम गोरक्षण संस्थेची स्थापना करून हेमंत मुरके यांनी सुरू केलेल्या कार्याची सर्वांनीच मुक्तकंठाने प्रशंसा केली. जखमी, आजारी, रोगग्रस्त गायींना या ठिकाणी बरे करण्यात येते. त्यांची हिरीरीने काळजी घेतली जात जाते, हे कार्य अतिशय मोलाचे असल्याचे गौरवोद्गार यावेळी प्रत्येकाने काढले. पतंजली योगपीठ तसेच बाबा रामदेव यांनीसुद्धा या कार्याला आशीर्वाद दिल्याने गौरक्षणाच्या या कार्याला आता चांगलेच बळ मिळाले आहे. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ व आ.यशोमती ठाकूर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी गाडगेबाबा वृद्धाश्रम, राजाराम प्रतिष्ठान, शाक्यमुनी बहुउद्देशीय संस्था, विश्वमाऊली वारकरी संस्था, पतंजली योग प्रशिक्षक संस्था, तपोवन, आपुलकी संस्था, आधार फाऊंडेशन, दिशा नेत्रपेढी, रक्तदान समिती, श्रद्धा सोसायटी, केदारेश्वर देहदान मंडळ, आयडियल संस्था, ज्ञानाई वारकरी संस्था, महात्मा ज्योतिबा फुले प्रतिष्ठान, प्रभात क्रीडा मंडळ, राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था, एकलव्य क्रीडा अकादमी आदी संस्थांचा गौरव करण्यात आला.