शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तत्काळ तिकिट बुकिंगमध्ये मोठा बदल! १५ जुलैपासून तत्काळ तिकीटासाठी ‘ओटीपी’ विना बुकिंग नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:11 IST

तात्काळ तिकीट योजनेत रेल्वे प्रशासनाकडून सुधारणा : सामान्य प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : सामान्य प्रवाशांना तत्काळ तिकीट योजनेचा सुलभपणे लाभमिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. लवकरच या निर्णयाची रेल्वे प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जाणार आहे.

१ जुलैपासून तत्काळ सुविधा अंतर्गत तिकिटांची बुकिंग फक्त भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (आयआरसीटीसी) च्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपमार्फत आधार प्रमाणीकरण केलेल्या वापरकर्त्याद्वारेच शक्य असणार आहे. यासोबतच १५ जुलैपासून तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आला आहे.

तत्काळ तिकिटांची बुकिंग रेल्वेच्या संगणकीकृत पीआरएस काउंटरवर किंवा अधिकृत एजंटांमार्फत सिस्टमद्वारे पाठवलेल्या ओटीपीच्या प्रमाणीकरणानंतरच होऊ शकतो. हा ओटीपी प्रवाशाने बुकिंग करताना दिलेल्या मोबाइल क्रमांकावर पाठवण्यात येणार आहे. ही सुविधादेखील १५ जुलैपासून लागू करण्यात येईल. रेल्वे प्रशासनाकडून नव्याने सुरू केलेल्या सोई सुविधेमुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

एजंटांच्या अवाजवी हस्तक्षेपाला आवररेल्वेचे अधिकृत तिकीट एजंट तत्काळ बुकिंगच्या पहिल्या दिवशी सुरुवातीच्या ३० मिनिटांपर्यंत तिकीट बुक करू शकणार नाहीत. वातानुकूलित (एसी) वर्गासाठी तत्काळ तिकीट बुकिंगची परवानगी सकाळी १० ते १०:३० या वेळेत अधिकृत एजंटांना दिली जाणार नाही. स्लीपर वर्गासाठी तत्काळ तिकीट बुकिंगची परवानगी सकाळी ११ ते ११:३० या वेळेत अधिकृत एजंटांना दिली जाणार नाही. या सुधारित तरतुदीचा उद्देश तत्काळ बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि सामान्य प्रवाशांना या सुविधेचा अधिकाधिक लाभ मिळावा असा आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीrailwayरेल्वे