अमरावती : रिपाइंचे ज्येष्ठ नेते, केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई यांचे ज्येष्ठ सुपुत्र भूषण गवई, हे येत्या १४ मे रोजी देशाचे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत. (Next CJI of Supreme Court)
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गवई यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ देतील.
बडेजाव नाही, साधे राहणीमान
भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला. घरात राजकारण, समाजकारण असताना भूषण गवई यांची वागणूक, राहणीमान सामान्य राहिले.
आजही ते सामान्य माणसाला भेटतात. त्यांच्यात कुठेही बडेजाव दिसून येत नाही. १४ मे रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या अनुषंगाने त्यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई यांच्याकडे विचारणा केली असता, मी दिल्ली येथे जाणार आहे.
मला विमानाचे तिकीटसुद्धा मिळाले असून, नागपूर येथून त्यांचे काही मित्र जाणार असल्याबाबत त्यांनी दुजोरा दिला.
ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहायक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली.