दादासाहेब गवर्इंच्या स्मारकाचे भूमिपूजन

By Admin | Updated: July 26, 2016 00:22 IST2016-07-26T00:22:09+5:302016-07-26T00:22:09+5:30

आंबेडकरी चळवळीतील अग्रणी नेते, बिहारचे माजी राज्यपाल, जिल्ह्याचे भूमिपूत्र रा.सू.ऊर्फ दादासाहेब गवई यांच्या कर्तृत्वाची सदैव प्रेरणा देण्यासाठी ...

The Bhumi Pujan of the memorial of Dadasaheb Gavri | दादासाहेब गवर्इंच्या स्मारकाचे भूमिपूजन

दादासाहेब गवर्इंच्या स्मारकाचे भूमिपूजन

पालकमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी : १० एकर जागेचे झाले हस्तांतरण 
अमरावती : आंबेडकरी चळवळीतील अग्रणी नेते, बिहारचे माजी राज्यपाल, जिल्ह्याचे भूमिपूत्र रा.सू.ऊर्फ दादासाहेब गवई यांच्या कर्तृत्वाची सदैव प्रेरणा देण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
याप्रसंगी दादासाहेबांच्या पत्नी कमलताई गवई, न्यायमूर्ती भूषण गवई, भदंत सुरेई ससाई, खा.आनंदराव अडसूळ, आ. सुनील देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, आ.रवी राणा, आ. यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, कुलगुरू मुरलीधर चांदेकर, न्या. पृथ्वीराज चव्हाण, राजेंद्र गवई, कीर्ती अर्जुन, राजेश अर्जुन, धरम अर्जुन, विश्वास गवई, वसंत गवई, विजय तायडे, भीमराज तायडे, सा.बां.चे अधीक्षक अभियंता बनगिनवार व कार्यकारी अभियंता जाधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूत्र दिवंगत रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे मागील वर्षी २५ जुलै रोजी निधन झाले. त्यांचा यथोचित मरणोपरांत सन्मान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मुंबई येथील सर्वपक्षीय सभेत केली होती.
सोमवारी २५ जुलै रोजी स्मारकाची मुहूर्तमेढ पालकमंत्र्यांच्या हस्ते कमलताई गवई व त्यांच्या कुटुंबियांच्या प्रमुख उपस्थितीत रोवली गेली. (प्रतिनिधी)

‘ये तो सबके बाप है...’
कार्यक्रमादरम्यान आमदार रवी राणा स्रेहभावाने कमलतार्इंजवळ गेले. अदबीने उभे राहिले. आईजवळ लेकरू सुरक्षित आहे, असे वाक्य त्यांनी उच्चारले. क्षणात ‘ये तो सबके बाप है’, अशी कोपरखळी आमदार यशोमती ठाकुरांनी केली. या विनोदाने सर्वच उपस्थित खळखळून हसले. कमलतार्इंनीही दाद दिली.

Web Title: The Bhumi Pujan of the memorial of Dadasaheb Gavri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.