शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

भीमा घे पुन्हा जन्म तू या दीनांसाठी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 22:55 IST

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती शनिवारी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्थांसह सामान्य नागरिकांनी उत्साहात साजरी केली.

ठळक मुद्देइर्विन चौकात उसळला जनसागर : सामाजिक संघटना, राजकीय पक्षांतर्फे बाबासाहेबांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती शनिवारी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्थांसह सामान्य नागरिकांनी उत्साहात साजरी केली. यानिमित्त इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अभिवादनासाठी जनसागर लोटला. याप्रसंगी अनुयायांनी कमालीची शिस्तबद्धता दाखविली, हे विशेष.इर्विन चौक, भीम टेकडी, बडनेरा नवीवस्तीतील अशोकनगर, समता चौकातील पुतळा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजतापासूनच फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर करून ‘एकच साहेब - बाबासाहेब’, ‘जब तक सूरज चांद रहेंगा - बाबा तेरा नाम रहेंगा’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. इर्विन चौकात शनिवारी सकाळपासूनच भरगच्च उपस्थिती होती. ती मध्यरात्रीनंतरही कायम होती महामानवाला अभिवादन करताना अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी किशोर बोरकर यांच्या पुढाकाराने सावलीसाठी कॉरिडॉरची सोय करण्यात आली. कॉरिडॉरला लागूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीने थंड पाणी तसेच स्वतंत्र चप्पल स्टँडची व्यवस्था केली होती. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन लक्ष वेधणारे ठरले. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, संत कबीर आदी समाजप्रबोधनकारांच्या विचारांचे ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होते. पंचशील, निळे झेंडे, गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे, प्रतिमांची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात झाली. याशिवाय तरुणांसाठी माळ, लॉकेट, साखळी, हँडबेल्ट, छोटेखानी मूर्ती आदी साहित्य विक्रीस उपलब्ध होते.पीपल्स सोशल इस्टिट्यूशन, समता सैनिक दल, त्रिरत्न बहुउद्देशीय संघातर्फे पाणीवाटप, संजय आठवले यांच्याकडून १२७ किलो बुंदीच्या लाडूचे वाटप, आनंदवन बहुउद्देशीय संस्थेतर्फे सरबत वाटप, दिशा ग्रुपतर्फे नेत्रदान जनजागृती, एलआयसी, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेच्यावतीने पाणीवाटप करण्यात आले. पारमिता महिला संघटनेचे कौटुंबिक संवाद केंद्र, भारतीय स्टेट बँक कर्मचारी संघटना, भारतीय बौद्ध महासभा, सिकलसेल जनजागृती केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ए.ए. नवी आशा समूहाचे दारू व्यसनमुक्ती केंद्र नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होते. विविध सामाजिक संघटनांनी मसाला भात, शरबत, आईस्क्रीमचे वाटप केले. बुद्धिस्ट फोरमने ‘एक पेन- एक वही’ हा उपक्रम राबविला.जयंती सोहळ्यातून एकतेचा संदेशडॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुर्वेद मेडिकोज, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयाच्या चमूने रोगनिदान शिबिरात अनेकांची तपासणी केली. भारिप-बहुजन महासंघाचे गुणवंत देवपारे, नंदेश अंबाडकर, गुड्डू गवई, बाबाराव गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, अंकुश वाकपांजर आदींच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चा, बसपा, रिपाइंच्या विविध गटांनी कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. भीम आर्मीतर्फे बडनेरा ते अमरावती दरम्यान मोटरसायकल रॅली काढली. समता सैनिक दलाने पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. रिपाइं (गवई) गटातर्फे शुक्रवारी रात्री १२७ किलो वजनाचा केक कापून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजेंद्र गवई, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, मनपा आयुक्त हेमंत पवार उपस्थित होते. अभिवादन सोहळ्याला पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, किशोर बोरकर, माजी आ. रावसाहेब शेखावत, दिलीप एडतकर, विलास इंगोले, बबलू शेखावत, रामेश्वर अभ्यंकर, प्रफुल्ल गवई, अमोल इंगळे, कांचनमाला गावंडे, छाया दंडाळे, मयूरा देशमुख, सुरेखा लुंगारे, मुजफ्फर अहमद, संजय मापले, महेंद्र भालेकर, अनिल माधोगढिया उपस्थित होते.एकता रॅली आयोजन समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. उद्घाटन पानी फाऊंडेशनच्या रिना दत्ता यांच्या हस्ते व उद्योजक संजय पमनानी यांच्या उपस्थितीत झाले. स्वागताध्यक्ष भारतीय जैन संघटनेचे प्रदीप जैन होते. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, समिती संयोजक राजू नन्नावरे, अपर्णा जोगळेकर, अखिल भारतीय जैन संघटनेचे सुदर्शन जैन, राजेश अटलानी, सुभाषचंद्र पाटणकर, अनिल हरवानी आदी उपस्थित होते. यावेळी रिना दत्ता यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार, साहित्यिक अशोक पळवेकर यांना साहित्यरत्न पुरस्कार, सूर्यकांत राऊत यांना राजपत्रित अधिकारी सेवा पुरस्कार, चंद्रकांत पोपट यांना उद्योजक सेवा गौरव पुरस्कार, वैद्यकीय सेवा पुरस्कार भूषण मुरके, विधिरत्न पुरस्कार पी.एस. खडसे, कला-क्रीडा सांस्कृतिक पुरस्कार कमल पी. माईकल, पत्रकारिता सेवा गौरव पुरस्कार कुमार बोबडे, विशेष गौरव पुरस्कार हर्षल बनसोड, संभाजी सिरसाट, ओमप्रकाश सुखदेवे, संजय बाळापुरे, तर समाज गौरव पुरस्कार भावना पसारकर, उद्धव गवई, कांचन गजबे, शुभम गुल्हाने यांना बहाल करण्यात आला. ‘भरारी निळ्या पाखरांची’ या बुद्ध-भीमगीतांचा कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.सुरक्षिततेसाठी पोलीस चौकीइर्विन चौकात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर अभिवादनासाठी होणारी अनुयायांची गर्दी ही जणू यात्रा भरल्याचा अनुभव देत असते. गतवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस प्रशासनाकडून स्वतंत्र चौकी लावण्यात आली. या चौकीतून बारीकसारीक बाबी टिपल्या जात होत्या. पोलीस निरीक्षकांसह फौजफ ाटा सुरक्षेसाठी तैनात होता.

शुक्रवारी सायंकाळपासूनच भरगच्च उपस्थिती...: अमरावती शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त इर्विन चौकात शुक्रवारी रात्री १२ वाजतापासूनच अभिवादनासाठी अनुयायांनी हजेरी लावणे सुरू केले. यामध्ये सर्व स्तरांतील स्त्री-पुरुषांचा समावेश होता. राज्यघटनेच्या माध्यमातून ते अनुभवत असलेले स्वातंत्र्य, मोकळीक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या द्रष्ट्या महामानवाच्या चरणी नतमस्तक होताना प्रत्येकाच्या डोळ्यांत केवळ कृतार्थ भाव होता.