भाऊसाहेबांचे विचार नव्या पिढीला प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:16 IST2021-08-28T04:16:57+5:302021-08-28T04:16:57+5:30
वरूड : व्हॅट्सअँप आणि इंटरनेटमुळे मुले खेळ क्रीडा विसरले आहे. भावी पिढीला भाऊसाहेबांच्या विचारांची गरज असून शिक्षण आणि तंत्र ...

भाऊसाहेबांचे विचार नव्या पिढीला प्रेरणादायी
वरूड : व्हॅट्सअँप आणि इंटरनेटमुळे मुले खेळ क्रीडा विसरले आहे. भावी पिढीला भाऊसाहेबांच्या विचारांची गरज असून शिक्षण आणि तंत्र शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. आजही आम्ही भाऊसाहेबांच्या विचारावर चालणारी माणसे असून हे विचार भावी पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशु संवर्धन आणि दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सत्काराला उत्तर देताना स्थानिक महात्मा फुले महाविद्यालयातील आयोजित कार्यक्रमात केले.
भाऊसाहेबांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे कार्य प्रत्येकाने करावे. महात्मा फुले महाविद्यालयाला बाजूची पशु दवाखान्याची जागा देण्याचे त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, सत्कारमूर्ती पशु संवर्धन आणि दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार, प्रमुख अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, आ. देवेंद्र भुयार, प्राचार्य डॉ. जयवंत वडते, डॉ. अंजली ठाकरे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य जयवंत वडते यांनी करून महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोखा सांगितला. संचालन डॉ. राजेश मिरगे, आभार डॉ. पंजाब पुंडकर यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे आजीव सदस्य, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.