भारिप-बहुजन महासंघाचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By Admin | Updated: June 29, 2016 00:20 IST2016-06-29T00:20:58+5:302016-06-29T00:20:58+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्य इम्फ्रुव्हमेट ट्रस्टची दादर येथील आंबेडकर भवनाची...

भारिप-बहुजन महासंघाचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
निवेदन : आंबेडकर भवन पाडणाऱ्यांचा निषेध
अमरावती : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्य इम्फ्रुव्हमेट ट्रस्टची दादर येथील आंबेडकर भवनाची इमारत पाडल्याच्या प्रकराचा निषेध करण्यासाठी मंगळवारी भारीप बहुजन महासंघाने जिल्हाकचेरीवर निषेध मोर्चा काढला. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी के.आर परदेशी यांना निवेदन देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९४४ मध्ये समाजाच्या उद्धारासाठी वरील ट्रस्टची स्थापना केली. या ठिकाणी प्रिटींग प्रेस व इमारत बांधण्यात आली होती. येथूनच आंबेडकर चळवळ चालवली जात होती. ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी भारीप बहूजन महासंघाने इर्वीण चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढूृन शासन व प्रशानाचे लक्ष वेधले. आंदोलनात भारिपचे जिल्हाध्यक्ष अनिल बरडे, रामभाऊ पाटील, मिलिंद डोंगरे, अशोक गोंडाणे, नीलम रंगारकर, सतीश काळे, मो.अयाज मो.अहीफ, सदानंद नागे, विनायक दुधे, सतीश सियाले, नितीन थुराटे, रघुनाथ पाटील, जानराव मनोहर, प्रवीण लेंदे, प्रशांत वानखडे, बळवंत गाठे, सतीश यावले व पदाधिकारी सहभागी झाले होते.