भरदिवसा गोळीबार - चांदणी चौक हादरला
By Admin | Updated: November 23, 2014 23:10 IST2014-11-23T23:10:15+5:302014-11-23T23:10:15+5:30
स्थानिक चांदनी चौकात दोन गटांतील वादातून हवेत गोळीबार झाल्याची माहिती पसरताच परिसरात खळबळ उडाली. काही काळ तणाव निर्माण झाला. परिसरात काडतूसही आढले. गोळीबार झाल्याचा

भरदिवसा गोळीबार - चांदणी चौक हादरला
आमनेसामने : शेख जफर व अहेफाज खान गट
अमरावती : स्थानिक चांदनी चौकात दोन गटांतील वादातून हवेत गोळीबार झाल्याची माहिती पसरताच परिसरात खळबळ उडाली. काही काळ तणाव निर्माण झाला. परिसरात काडतूसही आढले. गोळीबार झाल्याचा दावा परिसरातील नागरिकांचा आहे.
पोलिसांनी उपमहापौर शेख जफर याच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल केलेत. निवडणुकीतील वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
शेख नईम शेख रहिम (२१), अब्दुल मजीद अब्दुल रशिद (२८) , मो. अहेफाज मो. ऐजाज (३६), साबीर खान हमजा खान (३७) रा. सर्व अमरावती या चौघांना नागपुरी गेट पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनुसार, काही दिवसांपासून उपमहापौर शेख जफर शेख जब्बार आणि अहेफाज खान या दोन गटांत वाद सुरू आहे. याच वादातून शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास चांदनी चौकातील मौलाना दूध डेअरीजवळ उपमहापौर शेख जफर गटाचे शेख नईम शेख रहिम व साबीर खान यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर साबीर खान आणि मो. अहेफाज हे दोघेही शेख नईम याला त्याच्या घरी शोधायला गेले. यावेळी एका पानटपरी चालकाने शेख नईम याला शोधत असल्याची माहिती त्याच्या वडिलांना दिली.