भरधाव टिप्परची प्रवासी ऑटोला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST2021-03-05T04:13:20+5:302021-03-05T04:13:20+5:30
आठ जण जखमी : तळेगाव - देवगाव हायवेवरील घटना तळेगाव दशासर : येथून देवगावकडे जाणाऱ्या प्रवासी ऑटोला भरधाव येणाऱ्या ...

भरधाव टिप्परची प्रवासी ऑटोला धडक
आठ जण जखमी : तळेगाव - देवगाव हायवेवरील घटना
तळेगाव दशासर : येथून देवगावकडे जाणाऱ्या प्रवासी ऑटोला भरधाव येणाऱ्या टिप्परने ओव्हरटेक करण्याच्या नादात धडक दिली. या अपघातात ऑटो उलटून प्रवाशांसह ऑटोचालक गंभीर जखमी झाला.
येथील मो. कलिम मो. फारूक हा एमएच २७ एएफ ८७१ क्रमांकाचा ऑटो घेऊन सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास देवगावसाठी निघाला असता, सुपर एक्स्प्रेस नागपूर-औरंगाबाद हायवेवर देवगावहून तळेगावकडे येणाऱ्या एपी ३९ यू २९१० या टिप्परने ऑटोला कट मारल्याने ऑटो उलटला. यात भाऊराव शिंदे, संध्या पोटे, प्रगती पोटे, खंडू शिंदे, कामिनीबाई घुले, बालाबाई शिंदे व ऑटोचालक अशे आठ जण जखमी झाले. जखमींपैकी आठही जण तळेगाव येथील रहिवासी आहेत. महामार्ग पोलीस व तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना तातडीने उपचारार्थ यवतमाळला पाठविले.