दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला भारत कृषक समाजाचे समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:37 IST2021-01-08T04:37:15+5:302021-01-08T04:37:15+5:30
अमरावती : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे तीन कृषी कायदे रद्द करावे, याकरिता संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांचे दिल्ली येथे कैक ...

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला भारत कृषक समाजाचे समर्थन
अमरावती : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे तीन कृषी कायदे रद्द करावे, याकरिता संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांचे दिल्ली येथे कैक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भारत कृषक समाजाने सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. भारत कृषक समाजाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष अजयवीर जाखड यांच्या अध्यक्षतेत पार पडली. बैठकीत संपूर्ण भारतातून भारत कृषक समाजाच्या सभासदांनी सदर आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्राची जबाबदारी डॉ. वसंत लुंगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या बैठकीला बुटासिंह बाजवा (पंजाब), मनमोहन सिंह (पंजाब), बलविंदरसिंह (पंजाब), सोहमलाल वर्मा (राजस्थान), मुरलीधर पाटील (महाराष्ट्र), सुनीता येरणे (महाराष्ट्र), गीता मिश्रा (मध्यप्रदेश), चांदबिर (हरियाणा), हेम डागर (उत्तर प्रदेश), रमेश रामट (बिहार), व्ही. चंद्रानायडू (तामिळनाडू), व्ही.रामाराव (आंध्र प्रदेश), डॉ. नरेंद्र राणा (दिल्ली) उपस्थित होते.