भानखेडा जंगलात वणवा
By Admin | Updated: May 20, 2015 01:08 IST2015-05-20T01:08:51+5:302015-05-20T01:08:51+5:30
वडाळी वनपरिक्षेत्रातंर्गत भानखेडा मार्गावरील जेवड बिटमध्ये सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान अचानक वणवा पेटला.

भानखेडा जंगलात वणवा
अमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रातंर्गत भानखेडा मार्गावरील जेवड बिटमध्ये सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान अचानक वणवा पेटला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दीड तास प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. अज्ञाताने आग लावण्याचा संशय वनविभागाला आहे.
उन्हाळ्यात जंगलात आग लागण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. तसेच काही वेळा जगंलात चराईकरिता जाणारे नागरिक जगंलात आग लावून पळून जाण्याच्याही घटना आढळून आल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान जंगलात आग लागल्याची माहिती वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के.लाकडे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ काही वनमजुरांना घटनास्थळी पाठविले. वनमजुरांनी दीड तासात आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, आगीमुळे जगंलातील बराच मोठा भाग जळून खाक झाला होता.
आग लागल्यामुळे जंगलातील वन्यप्राणी व पक्ष्यांवर विपरित परिणाम झाल्याचेही आढळून आले आहे.