विनाकारण बाहेर फिरताय तर खबरदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:11 IST2021-04-19T04:11:51+5:302021-04-19T04:11:51+5:30

चांदूर रेल्वे : राज्य शासनाच्या आदेशानुसार ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गत संचारबंदीचे आदेश १ मेपर्यंत लागू झाले आहे. असे ...

Beware if you walk out for no reason! | विनाकारण बाहेर फिरताय तर खबरदार!

विनाकारण बाहेर फिरताय तर खबरदार!

चांदूर रेल्वे : राज्य शासनाच्या आदेशानुसार ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गत संचारबंदीचे आदेश १ मेपर्यंत लागू झाले आहे. असे असतानाही काही नागरिक विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरत असल्यामुळे आता चांदूर रेल्वे पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल केल्याची कारवाई ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात सहायक ठाणेदार विक्रांत पाटील यांनी शनिवारी केली.

चांदूर रेल्वे तालुक्यात कोरोनाग्रस्तांना संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने जीवनावश्यक सुविधा वगळता सर्वच आस्थापना, दुकाने बंद आहेत. मात्र, तरीही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यासाठी आता चांदूर रेल्वेत पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. विनाकारण फिरणारे अहिंसक श्रीराम वैद्य (४७, रा. कारला) व परशराम एकनाथ परिहार (५८ रा. शिवाजीनगर) या दोघांवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भादंविचे कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक ठाणेदार विक्रांत पाटील, सहायक उपनिरीक्षक शंकर ढोले, पोलीस कर्मचारी संदीप शिरसाट, शुद्धोधन उमाळे यांनी केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.

--------------------------------

Web Title: Beware if you walk out for no reason!