खबरदार! कामांच्या गुणवत्तेशी तडजोड कराल तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 00:12 IST2022-10-08T00:11:05+5:302022-10-08T00:12:20+5:30
बेलोरा विमानतळाचे कामाला पुढील आठवड्यात सुरुवात होत आहे. रन वेवर फायनल कोट टाकण्यात येणार आहे. २३०० मीटरपर्यंत हे काम वाढविण्यात येईल. सन २०१८ नंतर ज्या कामांना निधी मिळालेला नाही, त्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधी देणार असल्याचे फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते.

खबरदार! कामांच्या गुणवत्तेशी तडजोड कराल तर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणारी कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्वक व्हावी. निधी संपूर्णपणे खर्ची पडावा. त्यासाठी आवश्यक मान्यता आदी प्रक्रिया गतीने पूर्ण करावी. कामाच्या गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिले.
अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीची नवे शीर्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बेलोरा विमानतळाचे कामाला पुढील आठवड्यात सुरुवात होत आहे. रन वेवर फायनल कोट टाकण्यात येणार आहे. २३०० मीटरपर्यंत हे काम वाढविण्यात येईल. सन २०१८ नंतर ज्या कामांना निधी मिळालेला नाही, त्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधी देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार बच्चू कडू, आमदार रवि राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, आमदार बळवंत वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, आमदार किरण सरनाईक, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विकासकामांच्या प्रशासकीय, तांत्रिक मान्यता आदी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून कामांना वेग द्यावा. सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. कामे गुणवत्तापूर्ण असावीत. कामांच्या दर्जात तडजोड खपवून घेणार नाही. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी नवीन हेड तयार करण्यात येईल, असे सुतोवाच त्यांनी केले.
अमरावती विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. नाईट लँडिंगची सुविधा आधी पूर्ण करावी. विमानतळ धावपट्टीची लांबी-२ हजार ३०० मीटर करण्यासाठी प्रस्ताव देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.